पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल स्वप्निल कुसाळे याला मध्य रेल्वेने प्रमोशन दिले आहे.  X account
राष्ट्रीय

Paris Olympics Swapnil Kusale | ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर स्वप्नील कुसाळेला रेल्वेकडून प्रमोशन

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कांबळवाडी (जि. कोल्हापूर) येथील स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी ५० मीटर रायफल ३ पोझिशन स्पर्धेत ऐतिहासिक पदक जिंकले. त्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. तर मध्य रेल्वेने त्याला तिकीट चेकर पदावरून बढती दिली असून ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (OSD) स्पोर्ट्स सेल म्हणून पदोन्नती दिली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून आज (दि.२) देण्यात आली आहे. (Paris Olympics Swapnil Kusale)

Summary

  • स्वप्नीलची तिकीट चेकर पदावरून ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (OSD) पदावर पदोन्नती

  • मध्य रेल्वेकडून आज (दि.२) पदोन्नतीची घोषणा

  • स्वप्नील २०१५ पासून मध्य रेल्वेत कार्यरत

मध्य रेल्वेच्या स्पोर्ट्स विभागाचा अधिकारी म्हणून जबाबदारी

स्वप्निल सध्या मध्य रेल्वेच्या पुणे विभागात तिकीट चेकर म्हणून काम पाहात आहे. आता त्याला ओएसडी पदी बढती मिळाल्यानंतर मध्य रेल्वेच्या स्पोर्ट्स विभागाचा अधिकारी म्हणून मुंबईत जबाबदारी दिली जाणार आहे. (Paris Olympics Swapnil Kusale)

भारतात भव्य स्वागत होणार

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी सांगितले की, स्वप्नील कुसाळे याची ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) या पदावर नियुक्ती दिली जाणार आहे. तसेच त्याला बक्षीस म्हणून रक्कमही रेल्वेकडून दिली जाणार आहे. त्याचे भारतात भव्य स्वागत करण्यात येणार असून तयारी सुरू केली असल्याचे यादव यांनी सांगितले. (Paris Olympics Swapnil Kusale)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT