Swami Paramatmanand open Letter Rahul Gandhi  File Photo
राष्ट्रीय

Swami Paramatmanand open Letter : 'शिव-पार्वती' पोस्टवरून स्वामी परमात्मानंद यांचे राहुल आणि प्रियांका यांना खुले पत्र

भगवान शिव व पार्वती माता प्रतिमेमागे एक सखोल दार्शनिक अर्थ दडलेला आहे

पुढारी वृत्तसेवा

Swami Paramatmanand open Letter Rahul Gandhi : हिंदू संत स्वामी परमात्मानंद सरस्वती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांना एक खुले पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी राहुल गांधींनी अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका प्रतिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट केले आहे. हे छायाचित्र नुकतेच राहुल गांधी यांनी समाजमाध्यमांवर शेअर केले होते.

या प्रतिमेमागे दडलाय सखोल दार्शनिक अर्थ

आपल्या पत्रात स्वामीजी नमूद करतात की, भगवान शिवांच्या मांडीवर माता पार्वती विराजमान असल्याचे जे पारंपरिक चित्रण आहे, ते शिव (शक्तीचे स्वामी) आणि शक्ती (सृजनशील ऊर्जा) यांच्यातील संबंध दर्शवते. या प्रतिमेमागे एक सखोल दार्शनिक अर्थ दडलेला आहे. याचे मूळ हे उपनिषदे आणि हिंदू धर्मग्रंथांमध्ये आहेत.

'प्रतिमेचे महत्त्व स्पष्ट करणे आवश्यक आहे'

स्वामी सरस्वती म्हणतात की, या प्रतिमेद्वारे राहुल यांना नेमका काय संदेश द्यायचा होता हे त्यांना माहीत नसले, तरी त्याचे खरे महत्त्व स्पष्ट करणे त्यांना आवश्यक वाटले. मला समजले आहे की, तुम्ही भगवान शिवांच्या मांडीवर माता पार्वती विराजमान असलेली एक प्रतिमा पोस्ट केली आहे. तुम्हाला नेमका काय संदेश द्यायचा आहे हे मला माहीत नाही, परंतु मला हे पत्र लिहिणे गरजेचे वाटले. हे केवळ एक चित्र नाही; यात एक सखोल अर्थ दडलेला आहे. हे उपनिषदांमधील गहन ज्ञानाचे प्रतिबिंब आहे."

शिव आणि शक्तीबद्दल स्वामीजी काय म्हणतात?

या प्रतिमेचा प्रतीकात्मक अर्थ स्पष्ट करताना, स्वामी सरस्वतींनी पत्रात नमूद केले आहे की, 'उमा-महेश्वर'चे पारंपरिक चित्रण 'परम सत्य' (ब्रह्म) आणि त्याची 'सृजनशील शक्ती' (माया) यांच्यातील संबंध दर्शवते. वेद आणि उपनिषदांमध्ये 'परम सत्य'चे म्हणजेच 'ब्रह्मा'चे वर्णन केले आहे. ते स्वतः निराकार, अपरिवर्तनीय आणि सर्व प्रकारच्या क्रियांपासून अलिप्त आहे. तर "पार्वती माता 'शक्ती'चे प्रतिनिधित्व करते. तिला 'माया' (प्रकटीकरणाची शक्ती) असेही संबोधले जाते. भगवान शिव हे परम सत्य आहे ज्यांच्यापासून पार्वतीचे अस्तित्व आणि तिच्या सर्व क्रियांचा उगम होतो."

राहुल गांधी यांनी शिव-पार्वतीचे छायाचित्र का केले होते शेअर ?

सोमवारी नवी दिल्लीत आपल्या आईच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या आठवणींच्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलताना राहुल यांनी आठवण सांगितली की, कुटुंबासोबत जेवताना त्यांचे आई-वडील एकत्र बसायचे आणि आई वडिलांच्या मांडीवर बसायची. ती माझ्या वडिलांची होती आणि माझे वडील तिचे होते.” त्यांनी आईला असेही म्हटले होते, “मम्मी, पप्पा तुझ्यावर खूप प्रेम करायचे; पण तुझा त्यांना किती अभिमान वाटायचा, हे मी तुला शब्दांत सांगूही शकत नाही.” या विधानांवर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यासह भाजप नेत्यांनी टीका केली होती.त्यानंतर राहुल गांधी यांनी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे छायाचित्र शेअर केले. सोबत लिहिलेल्या संदेशात त्यांनी आरोप केला की, भीती, राग आणि द्वेषामुळे भाजप व रा. स्व. संघाचे समर्थक प्रेमाची अनुभूती घेऊ शकत नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT