Hema Malini : राहुल गांधी हे देशासह पंतप्रधान नरेंद्र मोदींना कमी लेखतात!

हेमा मालिनी यांची नागपुरात टीका; सोनिया गांधी यांचे पुस्तक वाचल्यानंतरच प्रतिक्रिया देणार; लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये विविध राजकीय मुद्द्यांवर मांडली भूमिका
नागपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री हेमा मालिनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या
नागपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री हेमा मालिनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या
Published on: 
Updated on: 

नागपूर :  काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने देशाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कमी लेखण्याचे काम करत आहेत. त्यांच्या वक्तव्यांमधून देशाची प्रतिमा कमी दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका अभिनेत्री तथा मथुरा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार हेमा मालिनी यांनी केली. राहुल गांधी यांची ही भूमिका देशातील जनतेला चांगलीच माहिती असल्याचेही त्या म्हणाल्या. नागपुरात आयोजित लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या हेमा मालिनी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांच्या वक्तव्यांवर निशाणा साधला.

नागपुरातील लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्याचा आनंद व्यक्त करताना हेमा मालिनी यांनी साहित्य, ज्ञान आणि संस्कृतीच्या क्षेत्रात अशा महोत्सवांचे महत्त्व अधोरेखित केले. या महोत्सवाच्या माध्यमातून विविध विषयांवर चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण होणार असून, आपल्या हस्ते एका पुस्तकाचे प्रकाशनही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सावध भूमिका घेतली. आपण अद्याप हे पुस्तक वाचलेले नाही. त्यामुळे पुस्तकातील आशयाची माहिती नसताना त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. पुस्तक वाचल्यानंतरच त्याबाबत आपले मत व्यक्त करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, राहुल गांधी यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि देशाबाबतच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. राहुल गांधी नेहमीच देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात. देशाला कमी लेखण्याची त्यांची भूमिका जनतेपासून लपलेली नाही, अशी टीका हेमा मालिनी यांनी केली.

मथुरेतील बैठकीत निवडणूक रणनीतीवर चर्चा

उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मथुरा येथे ५० वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याची माहितीही हेमा मालिनी यांनी दिली. भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या मथुरेत झालेली ही बैठक सकारात्मक ठरली. आगामी निवडणुकीत पक्षाने कोणत्या पद्धतीने सहभागी व्हावे आणि पुढील राजकीय रणनीती कशी आखावी, यासह विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील राजकीय परिस्थितीबाबत विश्वास व्यक्त करताना भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद आपल्यासोबत असल्याचे त्या म्हणाल्या. श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने उत्तर प्रदेशात पुन्हा तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.