राष्ट्रीय

ताजमहाल परिसरातील दुकानदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

अविनाश सुतार

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : जागतिक वारसा असलेल्या 'ताजमहाल' परिसरात असलेल्या दुकानदार, व्यावसायिकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ताजमहालच्या सुरक्षा भिंतीलगत ५०० मीटर परिसरातील सर्व व्यावासयिक उपक्रम, दुकाने बंद करण्याच्या आदेशावर न्यायालयाने अंतरिम आदेश दिला आहे. या आदेशामुळे ताज पश्चिम गेट मार्केट असोसिएशनची चिंता तूर्त मिटली आहे.

न्यायालयाच्या आदेशामुळे ५०० मीटर परिघातील दुकाने सध्या हटवण्यात येणार नाहीत. २७ सप्टेंबर २०२२ रोजी ही सर्व दुकाने हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. याच आदेशाला व्यापाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तूर्त यासंबंधी कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने आगरा विकास प्राधिकरणाला दिले आहेत.

यापूर्वी देखील आगरातील ताजमहल जवळपास बांधकामासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचे आदेश दिले होते. न्यायालयाने ताज संरक्षित क्षेत्रात सर्व प्रकारचे बांधकाम तसेच औद्योगिक उपक्रमांवरील बंदी हटवली होती. न्यायालयाने ताजमहालाच्या जवळपास पायाभूत सुविधा, प्रदूषण न पसरवणाऱ्या उपक्रमांना परवानगी दिली होती. परंतु, यासाठी सेंट्रल एम्पावर्ड समितीची परवानगी घेणे न्यायालयाने बंधनकारक केले होते.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT