राष्ट्रीय

Supreme court on CBI : तर सीबीआय थेट गुन्हा दाखल करु शकते !

backup backup

एखाद्या प्रकरणात ठोस माहिती असेल तर गुन्ह्याचा संदर्भ देत सीबीआय थेट गुन्हा दाखल करु शकते, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court on CBI) शुक्रवारी तेलंगण राज्याशी संबंधित खटल्याच्या सुनावणीवेळी दिला.

बर्‍याचदा संवेदनशील आणि महत्वपूर्ण व्यक्तींचा सहभाग असलेल्या प्रकरणात सीबीआय थेट गुन्हा दाखल करीत नाही तर प्राथमिक तपास तक्रार (पीई) दाखल करुन गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात करते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्वाळ्यामुळे अशा प्रकरणांतही सीबीआय थेट गुन्हा दाखल करु शकते, हे स्पष्ट झाले आहे.

भारतीय दंड संहिता अर्थात सीआरपीसीमध्ये पीई दाखल करणे सक्तीचे आहे, असे कुठेही म्हटलेले नाही. अशा परिस्थितीत तपास संस्थांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायालय (Supreme court on CBI) देऊ शकते, अशी टिप्पणी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी केली.

सीबीआयने जर पीई दाखल न करण्याचा निर्णय घेतला तर तो आपला अधिकार आहे, असे आरोपी म्हणू शकत नाही. सीबीआयकडे एखाद्या प्रकरणाच्या अनुषंगाने ठोस पुरावे असतील तर ते थेट गुन्हा दाखल करु शकतात. मात्र गुन्हा कोणता, ते सीबीआयला सांगावे लागेल, असेही न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT