Flie Photo.
राष्ट्रीय

Supreme Court: सर्वोच्‍च न्‍यायालयात सरन्‍यायाधीशांवर 'चप्पलफेक', वकील ताब्यात; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम

वकिलाने केली न्यायालयात घोषणाबाजी

पुढारी वृत्तसेवा

CJI BR Gavai man tries to throw object during proceedings : सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान आज धक्‍कादायक घटना घडली. एका वकिलाने सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्‍याचा प्रयत्‍न केला. त्या व्यक्तीने न्यायालयात घोषणाबाजी देखील केली. नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढले, ज्यामुळे काही काळ न्यायालयीन कामकाजात व्यत्यय आला.

'लाईव्ह लॉ' वेबसाइटनुसार, प्रत्यक्षदर्शी वकील आणि उपस्थित लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्यक्तीला बाहेर काढले जात असताना त्याने “सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान” (हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही) अशी घोषणा दिली. काही साक्षीदारांनी त्याने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले, तर काहींच्या मते तो कागदाचा रोल फेकत होता. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने वकिलीचा पोशाख परिधान केला होता.

सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान...

मध्य प्रदेशातील खजुराहो येथे भगवान विष्णूच्या मूर्तीची पुनर्बांधणी करण्याच्या याचिकेवर सुनावणी सुरु होती. यावेळी अचानक एका वकिलाने सरन्‍यायाश बी. आर. गवई यांच्‍या एक वस्‍तू फेकली. तसेच "सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान," अशी घोषणाबाजीही केली. सुरक्षा कर्मचार्‍यांनी तत्‍काळ या वकिलास कोर्टरूममधून बाहेर काढले. या घटनेमुळे सत्र पुन्हा सुरू होण्यापूर्वी कामकाजात काही मिनिटे व्यत्यय आला.

अशा गोष्‍टींचा माझ्‍यावर परिणाम होत नाही: सरन्‍यायाधीश गवई

या घटनेवर प्रतिक्रिया देताना सरन्यायाधीश गवई म्हणाले: "या सर्व गोष्टींमुळे विचलित होऊ नका. आम्ही विचलित नाही आहोत. या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही."

मागील महिन्‍यात सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळली होती याचिका

मध्य प्रदेशातील खजुराहो येथे भगवान विष्णूच्या मूर्तीची पुनर्बांधणी करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना मागील महिन्‍यात सर्वोच्च न्यायालयाने ही "प्रसिद्धी हित याचिका" असल्‍याचे संबोधले होते. मध्य प्रदेशातील युनेस्कोच्या जागतिक वारसा खजुराहो मंदिर संकुलाचा भाग असलेल्या जावरी मंदिरात भगवान विष्णूची सात फूट उंचीची मूर्ती पुनर्बांधणी आणि पुनर्स्थापित करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. छतरपूर जिल्ह्यातील जावरी मंदिरात खराब झालेल्या मूर्तीची जागा बदलून त्याचे अभिषेक करण्याची मागणी करणाऱ्या राकेश दलाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. ही पूर्णपणे प्रसिद्धी हित याचिका आहे. जा आणि देवतेला स्वतः काहीतरी करायला सांगा. जर तुम्ही म्हणत असाल की तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात, तर तुम्ही प्रार्थना करा आणि काही ध्यान करा," असे सरन्यायाधीश म्हणाले होते. हा मुद्दा पूर्णपणे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या (ASI) अधिकारक्षेत्रात येतो. "हा एक पुरातत्वीय शोध आहे, एएसआय असे काही करण्यास परवानगी देईल की नाही... यात विविध मुद्दे आहेत," असेही सरन्‍यायाधीशांनीस्‍पष्‍ट केले होते.

'एससीबीए'ने केला घटनेचा निषेध

सरन्यायाधीश बीआर गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या वकिलाच्या कृत्याचा निषेध करणारा निवेदन सुप्रीम कोर्ट अॅडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशनने जारी केला आहे. 'एससीबीए' म्‍हटलं आहे की, "सर्वोच्‍च न्‍यायालय स्वतःहून या वर्तनाची दखल घेऊ शकते आणि अवमान प्रक्रिया सुरू करू शकते."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT