माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली, प. बंगालच्‍या माजी मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी. 
राष्ट्रीय

TMC crisis | ममतांसाठी युसूफ पठाणला खासदारकी सोडण्यास सांगितले होते का? सौरव गांगुलीने केला खुलासा

बहरामपूरमधून पठाण यांच्‍याकडे राजीनाम्‍याची मागणी केल्‍याची राजकीय वर्तुळात चर्चा

पुढारी वृत्तसेवा

Sourav Ganguly On TMC crisis : ममता बॅनर्जी यांनी सौरव गांगुलीला युसूफ पठाण यांच्याशी संपर्क साधून त्यांना बहरामपूरच्या खासदारकीचा राजीनामा देण्यास सांगण्याची विनंती केली होती, जेणेकरून ममता आगामी पोटनिवडणूक लढवून संसदेत प्रवेश करू शकतील, असा दावा करणार्‍या वृत्ताबाबत सौरव गांगुलीने सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.

प. बंगालच्‍या राजकारणात सौरव गांगुलीचे नाव चर्चेत

पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा कट्टर विरोधक सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभव झाला होता. आता ममता बॅनर्जी पोटनिवडणुकीद्वारे संसदेत प्रवेश करू शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. एका बंगाली दैनिकातील बातमीत असा दावा करण्यात आला होता की, तृणमूल काँग्रेसने (TMC) माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणला बहरामपूरचे खासदार पद सोडण्यासाठी तयार करण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची मदत घेतली होती. मात्र, गांगुलीने आता हे खळबळजनक दावे फेटाळून आहे.

काय आहे सौरव-युसूफ-ममता वाद?

सूत्रांचा हवाला देत या वृत्तात म्हटले होते की, टीएमसीची नजर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर मतदारसंघावर होती. माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांनी २०२४ मध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते अधीर रंजन चौधरी यांचा पराभव करून ही जागा जिंकली होती आणि ते 'जायंट किलर' ठरले होते. बहरामपूरमध्ये मुस्लिम लोकसंख्या ५०-५२% आहे, जी टीएमसीची मुख्य व्होट बँक मानली जाते. त्यामुळे ही जागा ममता यांच्यासाठी सुरक्षित जागा असल्याचे टीएमसीचे मत होते. तृणमूलमधील नेत्‍यांनी सौरव गांगुलीशी संपर्क साधून ममतांचा संदेश पठाणपर्यंत पोहोचवण्यास आणि त्यांना बहरामपूरची जागा रिकामी करण्याची विनंती करण्यास सांगितले होते, जेणेकरून ममता आगामी पोटनिवडणूक लढवू शकतील.

सौरव आणि युसूफ 'कोलकाता नाईट रायडर्स'साठी एकत्र खेळले होते

सौरव आणि युसूफ हे आयपीएलमध्ये 'कोलकाता नाईट रायडर्स' (KKR) कडून एकत्र खेळले होते, जरी तो काळ संक्षिप्त होता. या बातमीत पुढे असाही दावा करण्यात आला होता की, पठाण यांनी हा कथित प्रस्ताव फेटाळून लावला होता.हे वृत्त अशा वेळी आले आहे जेव्हा तृणमूलच्या संसदीय पक्षात बंडखोरी सुरू असल्याची चर्चा आहे. 'इंडिया टुडे टीव्ही'ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ टीएमसी खासदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या बंडखोर छावणीच्या संपर्कात आहेत.

सौरव गांगुलीने केला खुलासा

सौरव गांगुलीचे नाव चर्चेत आल्‍याने बंगालमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली असतानाच, गांगुलीने आज (दि. ६ जून) एक सविस्तर पत्रक जारी करून हे दावे "पूर्णपणे खोटे" असल्याचे सांगत फेटाळून लावले. त्‍यांनी स्‍पष्‍ट केले की, आजपर्यंत मी कधीही राजकीय बाबींमध्ये पडलेले नाहीत. संबंधित लेखातील माझ्‍याबाबतचे आरोप सत्याचा पूर्णपणे अपलाप करणारे आहेत. ममता यांनी युसूफ पठाणला कोणताही संदेश देण्याची विनंती त्याला कधीही केली नव्हती. तसेच या मुद्द्यावर आपण पठाण यांच्याशी कधीही संपर्क साधला नसल्याचेही त्याने नाकारले."मी कधीही युसूफ पठाण यांच्याशी संपर्क साधला नाही... त्यामुळे लेखात दावा केल्याप्रमाणे पठाण यांनी प्रतिक्रिया देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असे गांगुलीने स्‍पष्‍ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT