Sonam Raghuvanshi News: राजा रघुवंशी हत्या प्रकरणी जामीनावर बाहेर आलेली त्याची पत्नी सोनम रघुवंशीने पहिल्यांदाच काही वक्तव्ये केली आहेत. जरी सोनमला जामीन मिळाला असला तरी तिला शिलाँग सोडून जाता येणार नाहीये. सोनमने जामीनावर बाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया दिली. तिने हे सगळेजण माझ्याबद्दल खोटं बोलत आहेत. माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत. कृपा करून त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, मी या प्रकरणावर आताच काही बोलू शकत नाही. कारण हे प्रकरण अजून अंडर ट्रायल आहे.
देशभरात गाजलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आरोपी सोनमला जामीन मिळाला आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सोनमने आपली बाजू पहिल्यांच समोर ठेवली. तिने मी न्यायालयाच्या प्रत्येक निर्णयाचा सन्मान केला असून यापुढे देखील करेन असं सांगितलं.
मे २०२५ मध्ये मध्य प्रेदशातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशीची मेघालयमध्ये हत्या करण्यात आली होती. तो लग्नानंतर फक्त आठ दिवसात हनीमूनला शिलाँगला गेला होता. राजा यांचा मृतदेह २ जून २०२५ रोजी इस्ट खासी हिस्ल जिल्ह्यातील सोहरा सिविल सब डिव्हिजनच्या रियाट अर्लियांगमध्ये पार्किंग लॉटच्या खाली खोल दरीत मिळाला होता.
जामीनावर बाहेर आलेल्या सोनमने माध्यमांशी बोलताना सांगितलं की ती शिलाँगमध्येच राहणार आहे. मी इथून बाहेर जाणार नाही. मी सुरक्षेच्या कारणास्तव असं करत आहे. मी याबाबत काही बोलू शकत नाही. मी माझा खर्च स्वतःच करत आहे. माझी कोणीही मदत करत नाहीये. सोनमने ती तिचा खर्च कसा भागवत आहे हे उघड करणार नाही असं देखील सांगितलं.
सोनम रघुवंशीने जामीन मिळाल्यानंतर नेपाळला पळून जाईल अशी अफवा परसली होती. त्यावर सोनम म्हणाली की, ही चर्चा चुकीची आहे. राजा रघुवंशीचे भाऊ विपीनने या प्रकरणी सीबीआय तपासाची मागणी केली होती. आता सोनमने ती शिलाँगच्या बाहेर जाणार नसल्याचा दावा केला आहे. तिने लोकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोनम रघुवंशीचे भाऊ गोविंदने दावा केला आहे की राजा रघुवंशी हत्याप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सोनमपासून कुटुंबियांनी अंतर राखलं आहे. आम्ही तिच्यासाठी वकील नियुक्त केलेला नाही. तिला ती ज्या अवस्थेत आहे तसेच सोडून दिले आहे.
मध्यंतरी सोनम जेलमधून बाहेर आल्यानंतर तिचे वडील देवी रघुवंशी शिलाँगमध्ये दिसले होते. त्यानंतर आता सोनमचा भाऊ गोविंदचे हे वक्तव्य आलं आहे. गोविंद यांनी सांगितलं की कुटुंबियांनी यापूर्वीच सांगितलं होतं की सोनमला इंदौरमधील त्यांच्या घरात ठेवलं जाणार नाही.