Korba Bridge Theft News pudhari photo
राष्ट्रीय

Korba Bridge Theft News: एका रात्रीत ६० फूट लांब पूल गेला चोरीला... पोलिसांनीही डोक्याला लावला हात

Anirudha Sankpal

Korba Bridge Theft News: छत्तीसगडमधील कोरबामध्ये एक अजब अन् डोक्याला हात लावण्यासारखा प्रकार घडला आहे. या भागातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एक ६० फूट लांब लोखंडी पूल चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली आहे. ही तक्रार कलेक्टर कुणाल दुदावत आणि एसपी सिद्धार्थ तिवारी यांच्याकडे करण्यात आली. यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं अन् पोलिसांनी त्वरित याचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार केले.

एका रात्रीत पूल गायब

छत्तीसगडमधील कोरबा येथे शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या कालव्यावर अनेक वर्षापूर्वी एक लोखंडी पूल तयार करण्यात आला होता. हा पूल एका रात्रीत चोरी झाली आहे. नगरपालिकेच्या वॉर्ड नंबर १७ मध्ये नागरिकांना येण्याजाण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी हा पूल जवळपास ४० वर्षापूर्वी तयार केला होता.

हा पूल जवळपास ६० फूट लांब आणि ५ फूट रूंद होता. या बूल रात्री ११ वाजेपर्यंत जागच्या जागी होती. याचवेळी वॉर्ड १७ मदील लोकं या पुलावून येत घरी परतले होते. मात्र सकाळी उठून पाहिल्यावर त्यांना अख्खा पूलच गायब झाल्याचं दिसलं. यानंतर वॉर्डचे नगरसेवक लक्ष्मण श्रीवास यांनी पूल चोरीला गेल्याची सूचना पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. ते धावत पळत घटनास्थळी दाखल झाले तर पूल खरोखरच चोरीला गेला होता.

१५ लाखाचे तब्बल ३० टन लोखंड

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या पुलाची चोरी शहरात सक्रीय असलेल्या स्क्रॅप माफियांनी केली आहे. चोरी झालेल्या पुलाचे वजन जवळपास २५ ते ३० टन असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. याची बाजारभावानं किंमत ही १५ लाखाच्या आसपास होते.

सुरक्षा कवच देखील चोरीला

चोरांनी फक्त पूलच चोरून नेला नाही तर कोरबा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या पाण्याच्या पाईप लाईनची सुरक्षा करण्यासाठी लावलेले सुरक्षा कवच देखील चोरट्यांनी चोरून नेले आहेत. नशीब त्यांनी पाण्याचे पाईप कापून नले नाहीत नाही तर कोरबा शहरवासियांना पाण्याच्या एका थेंबासाठी तरसावं लागलं असतं अशी प्रतिक्रिया स्थानिक लोक देत आहे. या स्क्रॅप चोरट्यांनी शहराच उच्छाद मांडला आहे.

पोलिसांचा दावा ठरला फोल

दरम्यान, या स्क्रॅप माफियांना अळा घालण्यासाठी आता पोलिसांनी एक एसआयटी स्थापन केली आहे. कोरबा जिल्ह्यातील पोलिसांनी या भागातील स्क्रॅप व्यवसाय बंद झाल्याचा दावा केला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ठिकठिकाणी स्क्रॅपची ही दुकाने पुन्हा सुरू झाली आहेत. आता वॉर्ड क्रमांक १७ मधील ६० फूट लांब पूल चोरीला गेल्यानं पोलिसांचा हा दावा किती खोटा आहे हे सिद्ध झालं आहे. पोलिसांनी शहरातील दोन स्क्रॅप ठिकाणांवर कारवाई देखील केली. मात्र त्यांच्या हाती काही लागलेलं नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT