

Murder Case Extra Marital Affairs: दोन मुले पदरात असलेल्या पत्नीनं आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं आपल्या पतीला कायमचं झोपलं. तिनं बिर्याणीमधून झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना चिलुवूरू गावात घडली. मृत लोकम शिवनागराजू हे कांद्याचे व्यवासायिक होते. त्यांचे २००७ मध्ये लक्ष्मी माधुरीशी लग्न झाले होते.
या पती पत्नींना दोन मुलं आहेत. माधुरी ही विजयवाडा इथल्या चित्रपट गृहात तिकीट काऊंटरवर काम करत होती. तिथं तिचे गोपी नावाच्या एक व्यक्तीसोबत प्रेमसंबंध जुळले. गोपी हा सत्तनपल्लीचा राहणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माधुरीला तिचा पती तिच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधात अडथळा ठरतोय असं वाटत होत. जानेवारी १८ च्या रात्री माधुरीनं आपल्या पतीसाठी तयार केलेल्या बिर्याणीत २० झोपेच्या गोळ्या मिसळल्या. ही बिर्याणी खाल्यानंतर शिवनागराजू बेशुद्ध पडला. त्यानंतर माधुरीचा प्रेमी गोपी घरी आला.
गोपी माधुरीच्या घरी रात्री जवळपास ११.३० च्या दरम्यान आला होता. त्यानंतर गोपी हा शिवनागराजूच्या छाताडावर बसला अन् दुसऱ्या बाजूनं माधुरीनं उशीनं शिवनागराजूचे तोंड दाबून धरले. यामुळं शिवनागराजूचा श्वास कोंडला आणि त्याचा गुदमरून मृत्यू झाला.
माधुरीनं पतीला कायमंच झोपवल्यानंतर गोपी घरातून निघून गेला. धक्कादायक म्हणजे माधुरीनं ती संपूर्ण रात्र पॉर्न व्हिडिओ पाहून घालवली, यादरम्यान पतीचा मृतदेह रूममध्येच पडून होता. सकाळी लवकर माधुरीनं आरडा ओरडा करून आपल्या पतीचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा बनाव केला.
मात्र ज्यावेळी मृतदेहाच्या कानातून रक्त बाहेर आलेलं नातेवाईकांना दिसलं त्यानंतर त्यांचा संशय बळावला. त्यांनी शिवनागराजू यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांचा मृत्यू हा गुदमरून झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर पोलिसांनी माधुरी आणि गोपी यांना ताब्यात घेतलं आहे. पुढचा तपास सुरू आहे.