monthly expense Pudhari
राष्ट्रीय

Viral Story: सिंगल असूनही महिन्याचा खर्च ६३ हजार रूपये... २६ वर्षाच्या मुलीनं 'मेट्रो सिटी' कुठून पैसे काढते याचा हिशेबच मांडला

single woman monthly expense: खाण्यापेक्षा मनोरंजन अन् शॉपिंगवरच खर्च जास्त.... २६ वर्षाच्या तरूणीने महिन्याच्या ६३ हाजर खर्चाचा लेखाजोखाच मांडला

Anirudha Sankpal

Viral Story single Woman Monthly Expense 63000: ज्यावेळी तुम्ही तुमचे शहर सोडून मेट्रो सिटीमध्ये नोकरीसाठी जाता त्यावेळी तुम्हाला कळत नाही तुमचा पैसा कसा अन् कधी खर्च होत आहे. महिन्याच्या शेवटी आपण फक्त रिकाम्या खिशाकडे पाहून महागडं शहर असं म्हणता अन् १ तारखेच्या पगाराची वाट पाहत बसतो. मात्र बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका २६ वर्षाच्या तरूणीने जुन्या पद्धतीनं महिन्याचा खर्चाचा हिशेब लिहून काढला. अन् धक्कादायक माहिती समोर आली आली.

ही माहिती तिने सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांसमोर ठेवली. आता ती पोस्ट व्हायरल होत आहे. यात तिने आपल्याला सिंगल असूनही महिन्याला ६३ हजार रूपये कसा खर्च येतो अन् तिचे सर्वाधिक पैसे कुठं जातात याची माहिती दिली. शिवांजली नावाच्या अकांऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

मैत्रिणींसोबत शेअर करते रूम

शिवंजली या ३ बीएचके फ्लॅटमध्ये आपल्या कॉलेजच्या मैत्रिणींसोबत राहते. तिच्या फ्लॅटचे भाडे आणि मेंटेनन्स जवळपास २५ हजार रूपये जातो. यावेळी त्यांनी सकाळी नाष्टा आणि दुपारचे जेवण हे ऑफिसमध्ये होते. हे जेवण आणि नाष्टा फ्री असतो.

रात्रीत फ्लॅटमध्ये कूक येऊन रात्रीचे जेवण करते. याचा खर्च सर्व मैत्रिणी मिळून उचलतात. याचे कॉन्ट्रिब्युशन २००० रूपये येते. राशनचा खर्च हा ३००० हजार रूपये येतो.

बजेट कुठं बिघडतं?

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत शिवांजली म्हणते मी ऑफिसमध्ये जेवण करून पैसे वाचवते. मात्र वाचवलेल्या पैशापेत्रा जास्त खर्च हा बाहेर खाण्याने आणि शॉपिंगवर खर्च होतात. तिला शॉपिंग आणि बाहेर केलेल्या खर्चासाठी १२ हजार रूपये लागतात.

दुसऱ्या कामातही पैसा जातो

त्याचबरोबर फ्लॅटची साफसफाई आणि इतर कामांसाठी डोमेस्टिक हेल्पर ठेवण्यात आली आहे. तिला देण्यासाठी माझ्या वाट्याला १ हजार रूपये येतात. मी ऑफिसला येण्या जाण्यासाठी ऑनलाईन बाईकवर अवलंबून आहे. त्याचा खर्च सर्वासाधारणपणे ३००० रूपये येतो. कधी कधी जास्त डिमांड असेल तर ऑटो किंवा कॅब केली जाते. त्याचा खर्च ४००० रूपये होतो. म्हणजे महिन्याला येण्या जाण्यावरच तब्बल ७००० रूपये खर्च होतात.

६००० रूपयांचे मनोरंजन

शिंवांजलीने सांगितलं की आजकाल काही फ्री मिळत नाही. मनोरंजनावर तिचा महिन्याचा खर्च ६००० रूपये आहे. याच एआय टूल्स एआय क्लाऊड, ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि दुसऱ्या सविधांचा समावेश आहे. विशेष म्हणजे माझ्याकडे कोणती सबस्क्रिप्शन आहेत हे मलाच कधी कधी आठवत नाही.

पर्सनल केअर देखील खर्चिक

जे काम सर्वात शेवटी येते ते आहे शॉपिंग... कपडे आणि आपल्या पर्सनल केअरचे सामानाचा आकडा हा जवळपास ७००० रूपयांपर्यंत पोहचला आहे.

सर्व खर्चांची बेरीज केली तर एकूण रक्कम ही ६३,००० रूपयांपर्यंत पोहचते. हा खर्च पाहून शिवांजली स्वतः खूप अस्वस्थ आहे. हा आकडा पाहून नक्कीच भीती वाटते. मात्र कमीत कमी माझे पैसे कुठं जात आहेत याची एक कल्पना तर आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT