Shocking Crime News in Rajkot: राजकोट जिल्ह्यातील गोंदल तालुक्यातील एका २२ वर्षाच्या मुलाची त्यांच्या पालकांनीच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तक्रारीनंतर मृत मुलाच्या आई-वडिलांना अटक केली असून कुटुंबीयांनी या मुलाने स्वतःहून अॅसिड पिल्याचा दावा शवविच्छेदनात फोल ठरला.
मृत राम बमभावालाच्या घशात त्याच्या आईने (मनिषा मोती बामभावा ४५) बळजबरीने अॅसिड ओतल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी रामचे वडील बाबू उर्फ अतुल बमभावा (४७) यांनी रामचा गळा आवळला होता. ही घटना ३० जून रोजी झाली होती. त्यानंतर २० वर्षाची रामची पत्नी बन्सी यांनी रामच्या आई वडिलांविरूद्ध तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीवरून गोंदल तालुका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. त्या दोघा आई वडिलांना अटक करण्यात आली असून एफआयआरनुसार बन्सी आण राम यांचा विवाह पाच महिन्यापूर्वी झाला होता. बन्सीने आरोप केला आहे की तिचा पती नेहमी दारून पिऊन घरी येत होता आणि आपल्या वडिलांशी भांडत होता.
२९ जून रोजी बन्सी आणि राम हे बन्सीच्या माहेरी गेले होते. त्यावेळी राम दारू प्यायला होता. त्याचा बन्सीच्या वडिलांशी वाद झाला. बन्सीच्या वडिलांनी रामच्या वडिलांना बोलवून घेतलं. त्यानंतर रामला तुमच्या घरी घेऊन जावा असं सांगण्यात आलं.
दुसऱ्या दिवशी बन्सी आपल्या माहेरी असतानाच तिला रामने अॅसिड पिऊन जीवन संपवल्याची बातमी कळाली. अंत्यविधीनंतर सासरकडच्या पाहुण्यांनी बन्सीला राम ३० जून रोजी दारू पिऊन घरी आला होता त्याचा वडिलांशी वाद झाला होता.
दरम्यान, भांडणावेळी रामच्या आईने रामच्या घशात बळजबरीने अॅसिड ओतल्याचा आरोप करण्यात आला. ज्यावेळी तो संघर्ष करत होता त्यावेळी वडिलांनी त्याचा गळा आवळला होता असा आरोप करण्यात आला आहे.
बन्सीच्या वडिलांनी आरोप केला आहे की तिच्या सासरकडच्या मंडळींनी बन्सीला या घटनेबाबत कुठंही वाच्यता करू नको अशी धमकी दिली होती. त्यांनी जर ही बाब बाहेर आली तर घराची प्रतिष्ठा मलीन होईल असं त्यांचे म्हणणे होते.
या प्रकारानंतर राजकोट एसपी विजय सिंह गुज्जर यांनी सांगितलं की, रामचा मृत्यू हा संशयास्पद आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक पोस्टमार्टमचे आदेश दिले. त्यात मृत रामच्या गळ्याभोवती गळा आवळल्याच्या खुना दिसत आहेत. मृत्यूचे हेच कारण आहे. अॅसिड पिल्यामुळं त्याचा मृत्यू झालेला नाही. मृत रामच्या पत्नीचे देखील स्टेटमेंट देखील महत्वाचे आहे.
या पुराव्यांच्या आधारे रामच्या आई- वडिलांना पोलिसांनी २ जुलै रोजी अटक करण्यात आली अन् ३ जून रोजी त्यांना न्यायालयात नेण्यात आलं. दरम्यान पोलिसांनी अॅसिड बॉटल ताब्यात घेतली आहे. तसेच आरोपींनी त्या दिवशी घातलेले कपडे देखील ताब्यात घेण्यात आले आहेत. बेडशीटवर रामच्या उलटीचे डाग देखील होते.
प्राथमिक तपासात राम हा बेरोजगार होता. तो कामाच्या शोधात होता. त्याचे वडील चहाची गाडी चालवत होते.