Crime News: पार्किंगवरून वाद: अल्पवयीन मुलाने महिलेची केली हत्या, पतीलाही भोसकले

पार्किंगच्या किरकोळ वादातून एका २६ वर्षीय महिलेची अल्पवयीन मुलाने चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

Delhi parking rage

नवी दिल्ली: दिल्लीत पार्किंगच्या किरकोळ वादातून एका २६ वर्षीय महिलेची अल्पवयीन मुलाने चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नैऋत्य दिल्लीतील द्वारका भागात शनिवारी ही घटना घडली. विशेष म्हणजे, या घटनेदरम्यान पीडित दांपत्याचा ५ वर्षांचा मुलगा तिथेच उपस्थित होता आणि त्याच्या डोळ्यांदेखतच हा थरार घडला. या हल्ल्यात महिलेचा पतीही गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीत आरोपी अल्पवयीन मुलगा हा पीडित कुटुंबाचा शेजारी आणि दूरचा नातेवाईक आहे. पीडित व्यक्तीने आपली दुचाकी ज्या जागेवर पार्क केली होती, तिथे आरोपीचे वडील गाडा लावत असत. दुचाकी तिथे लावण्यास अल्पवयीन मुलाने विरोध केला. दुचाकीवर हात मारत आरडाओरडा करू लागला आणि गाडी तिथून हटवण्यास सांगू लागला. यावेळी घरकाम करणाऱ्या २६ वर्षीय पीडित महिलेने वाद मिटवण्यासाठी घराबाहेर येऊन मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा वाद अधिकच पेटला आणि संतापलेल्या अल्पवयीन मुलाने थेट महिलेच्या पोटात चाकू खुपसला.

Crime News
Wife Killed Husband : १७ वर्षे अनैतिक संबंध.. पत्नीने पतीला वीजेचे झटके देऊन संपवले! वर्षभरानंतर खुनाचा थरार उघड

या गोंधळाचा आवाज ऐकून सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे महिलेचे पती आणि त्यांचा ५ वर्षांचा मुलगा बाहेर पळत आले. आरोपी मुलाने पतीवरही चाकूने ५ ते ६ वार केले. पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, "हा हल्ला सुरू असताना अल्पवयीन मुलाचे वडील तिथेच हजर होते आणि ते मुलाला हल्ला करण्यासाठी चिथावणी देत होते." मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीच्या मोठ्या भावालाही या हल्ल्यात किरकोळ दुखापत झाली आहे.

पीडित कुटुंबावर गेल्या दोन वर्षांत कोसळलेला हा चौथा मोठा आघात आहे. यापूर्वी मुलाचे आजोबा, आजी आणि काका यांचे निधन झाले आहे. आता आईचे छत्र हरपल्याने आणि वडील मृत्यूशी झुंज देत असल्याने ५ वर्षांचा चिमुरडा एकाकी पडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चिमुरड्याला आणि त्याच्या गंभीर वडिलांना अद्याप महिलेच्या मृत्यूची कल्पना देण्यात आलेली नाही.

शनिवारी दुपारी २.५० च्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत नातेवाईकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले, तर पतीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Crime News
Crime News: अत्याचार सहन होईना, शेवटी पतीला ठार मारलं; ८ तास मृतदेहाजवळ बसली, मग मंदिरात जाऊन.., पुढे जे घडलं ते धक्कादायक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news