Crime News: मुलाला उलंट टांगलं; पतीला जागेवर खल्लास केलं... ८ तास मृतदेहाजवळ बसून काढणाऱ्या पत्नीनं आधी मंदीर गाठलं मग..

Crime News
Crime Newspudhari
Published on
Updated on

mp chhatarpur crime news: पती आपल्या पत्नीच्या माहेरी तिला भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी पती पत्नी यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झालं. प्रकरण एवढं वाढलं की पत्नीनं थेट आपल्या पतीला दांडक्यानं फोकळून काढत त्याचा जीवच घेतला.

मध्य प्रदेशातील छत्तरपूरमधील ही धक्कादायक घटना... पतीला दांडक्यानं मारून त्याचा जीव घेणाऱ्या पत्नीचं नाव आहे नीलम कुशवाहा. तिने पती दारू पिऊन आला होता असा आरोप केला आहे. इतकंच नाही तर पत्नीने पतीचा जीव घेतल्यानंतर ती त्याच्या मृतदेहाजवळ आठ तास बसून होती. अखेर आठ तासानंतर ती पोलिसांना शरण आली.

Crime News
Wife Killed Husband : १७ वर्षे अनैतिक संबंध.. पत्नीने पतीला वीजेचे झटके देऊन संपवले! वर्षभरानंतर खुनाचा थरार उघड

नीलम रहात होती माहेरच्या घरात

नीलम ही तिचा पती दीनदयाल कुशवाहापासून वेगळी रहात होती. गेल्या चार वर्षापासून ती तिच्या माहेरच्या घरात रहात होती. काही दिवसांपूर्वी दीनदयाल दारू पिऊन नीलमच्या घरी गेला. नीलमने सांगितलं की त्याने बळजबरीने दरा उघडलं आणि त्याने त्यांच्या मुलाला उलटं टांगलं. घाबरलेल्या नीलमला वाटलं की दीनदयाल तिच्या मुलाला काहीतरी करणार.

Crime News
Crime News: संतापजनक! गर्भवती पत्नीच्या गुप्तांगात हेक्सा ब्लेड खुपसून पतीने केली क्रूर हत्या

भीतीपोटी केलं कृत्य

या भीतीपोटी नीलमने शेजारीच पडलेले लाकडी दांडक्याने दीनदयालला मारायला सुरूवात केली. पहिल्या फटक्यातच दीनदयाल कॉटवर पडला. नीलमने भीतीपोटी त्याला अजून मारहाण केली. जबर जखमी झालेला दीनदयाल जागेवरच खल्लास झाला.

Crime News
Gujarat crime news husband sells wife: पत्नी आवडत नव्हती म्हणून ५० हजारांना विकली... बेपत्ता झाल्याची तक्रार केली, पती फसला

मंदिरात क्षमा याचना

त्यानंतर नीलम दीनदयालच्या मृतदेहाजवळ जवळपास आठ तास बसून होती. त्यानंतर ती जवळच्या मंदिरात गेली. तिथं ती देवीसमोर १० मिनिटे बसली आणि क्षमा याचना करायला लागली. त्यानंतर ती थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गेली आणि घडलेल्या घटनेची माहिती तिने दिली. ती पोलीस ठाण्यात जवळपास रात्री आठ वाजता आली. तिनं मी माझ्या पतीला ठार मारलं असल्याचं सांगितलं. पोलिसांना तिच्या पतीचा मृतदेह कॉटवर पडलेला मिळाला.

पोलिसांनी त्या मुलाला आपल्या ताब्यात घेतलं आणि मृतदेह शवविच्छदानासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news