Gang rape of school girl by minors
शाळकरी मुलीवर अल्पवयीन मुलांकडून सामुहिक अत्याचार  file photo
राष्ट्रीय

Gangrape News : तिसरीतील मुलीवर सहावीतील मुलांकडून बलात्कार आणि हत्या

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंध्रप्रदेशातील नांद्याला जिल्ह्यात एक खळबळजणक घटना समोर आली आहे. एका 8 वर्षांच्या शाळकरी मुलीवर तिच्याच शाळेतील तीन 12 ते 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केला. यानंतर घाबरुन तिची हत्या करुन तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीन आरोपींनी मुलीचा मृतदेह मुचुमरी येथील सिंचन कालव्यात फेकून दिल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीपासून 300 किमी अंतरावर असलेल्या मुचुमरी येथे ही घटना घडली. मुलीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. इयत्ता 3रीची विद्यार्थिनी रविवारपासून बेपत्ता होती आणि तिच्या वडिलांनी स्थानिक पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मुलगी मुचुमरी पार्कमध्ये खेळत होती, मात्र नंतर घरी परतली नाही, असे त्यांनी पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी श्वान पथकाच्या सहाय्याने शोध घेतला असता श्वानाने पोलिसांना तीन अल्पवयीन मुलांकडे नेले. त्यापैकी दोन सहावीच्या वर्गामधील विद्यार्थी आहेत. ज्यांचे वय 12 वर्षे आहे, आणि एक 13 वर्षे वयाचा सातवीचा विद्यार्थ्यी आहे. तिघेही मुलगी ज्या शाळेत शिकली त्याच शाळेतील विद्यार्थी आहेत. पोलिसांनी सांगितले की, चौकशीदरम्यान मुलांनी मुलीवर बलात्कार करून खून केल्याची कबुली दिली. आरोपींनी पोलिसांना सांगितले की त्यांनी मुलीला पार्कमध्ये खेळताना पाहिले होते आणि तेही तिच्यासोबत सामील झाले. त्यानंतर त्यांनी तिला मुचुमरी धरणाजवळील निर्जन भागात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पालकांना सांगितल्यास मुलगी अडचणीत येण्याची भीती असल्याने त्यांनी तिचा खून करून मृतदेह जवळच्या कालव्यात फेकून दिला, असे मुलांनी पोलिसांना सांगितले. मुचुमरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जयशेखर यांनी सांगितले की, मुलीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

रविवारपासून मुलगी बेपत्ता

इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी रविवारपासून बेपत्ता असून तिच्या वडिलांनी स्थानिक पोलिस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार नोंदवली होती. तिची मुलगी मुचुमरी पार्कमध्ये खेळत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले, परंतु ती नंतर घरी आली नाही, यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून स्थानिक लोकांकडे चौकशी केली, परंतु त्यांना तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.

SCROLL FOR NEXT