Jalgaon Crime News | अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार; एकाला अटक

अल्पवयीन मुलीवर दोन वेळा अत्याचार; आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
A minor girl raped
अल्पवयीन मुलीवर अत्याचार file photo
Published on
Updated on

जळगाव : धरणगाव तालुक्यात २०२३ मध्ये दिवाळीच्या नंतर एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चॉकलेटचे आमिष देऊन अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. अत्याचार केलेल्या आरोपीचा साक्षीदार मित्राने देखील पिडीतेसोबत झालेला अत्याचार सगळ्यांना सांगून देईल असे सांगून धमकावत पिडीतेवर शेतशिवारात नेऊन अल्पवयीन मुलीवर पुन्हा अत्याचार केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, मध्यप्रदेश मधील बडवाणी जिल्ह्यातील १४ वर्षीय मुलगी परिवारासह धरणगाव तालुक्यातील एका शेतात वास्तव्याला आहे. आरोपी प्रवीण छत्र्या बारेला (रा. कानळदा ता.जळगाव) याने सन २०२३ मध्ये दिवाळीनंतर ४ ते ५ दिवसांनी तसेच जानेवारी २०२४ दरम्यान अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दिले. त्यानंतर धरणगाव तालुक्यातील एका शिवारात नेऊन अत्याचार केले. तसेच पीडित मुलीला व तिच्या आई वडिलांना जीवे ठार मारून देण्याची धमकी दिली. प्रवीण बारेला हा पीडित मुलीशी शारीरिक संबंध करीत असल्याचे पाहून दुसरा आरोपी पन्नालाल मराठे (रा. पारोळा नाका ता. धरणगाव) याने देखील पीडित अल्पवयीन मुलीला एकांतात गाठून प्रवीण बारेला आणि तुझ्या झालेल्या शारीरीक संबंधाबाबत सर्वांना सांगून देईल अशी धमकी दिली. त्यानंतर पन्नालाल मराठे याने देखील अल्पवयीन मुलीला शेत शिवारात अत्याचार केला. याबाबत पीडित मुलीने तिच्या आईला घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. मुलगी व आईच्या फिर्यादीावरून आरोपी प्रवीण बरेला आणि पन्नालाल मराठे यांच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पन्नालाल मराठे यास अटक करण्यात आली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनावणे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news