नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : हवाला प्रकरणात अडकलेले दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या कोठडीत स्थानिक न्यायालयाने २० जुलैपर्यंत वाढ केली आहे. सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांच्या पत्नी पूनम यांनादेखील अलिकडेच सक्तवसुली संचलनालयाने समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
हवाला प्रकरणात गुन्हा नोंदविल्यानंतर ईडीने सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांना गेल्या ३० मे रोजी अटक केली होती. आतापर्यंत दोनवेळा जैन यांच्या देशभरातील ठिकाणांवर ईडीने छापे मारलेले आहेत. या छाप्यादरम्यान २.८५ कोटी रुपये इतकी रक्कम तसेच १३३ सोन्याची नाणी जप्त करण्यात आली होती. बनावट कंपन्या तयार करुन हवाला मार्गाने पैसा कमाविणे व या पैशाचा वापर दिल्ली परिसरात जमिनी घेण्यासाठी करणे असे गंभीर आरोप जैन यांच्यावर आहेत.
हेही वाचलंत का ?