राष्ट्रीय

स्मार्ट शहरांच्या योजनेवर समाधानकारक काम : केंद्रीय मंत्री हरदीप पुरी

backup backup

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : स्मार्ट शहरांच्या योजनेवर समाधानकारकपणे काम सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी आज (दि.९) लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. देशातील शंभर शहरे स्मार्ट बनविण्याची मोहिम काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने हाती घेतली होती.

स्मार्ट शहरांच्या योजनेवर व्यापकपणे काम सुरु आहे. मध्यंतरीच्या काळात आलेले कोरोनाचे संकट तसेच स्थानिक समस्यांमुळे काही शहरांतील कामाला खीळ बसली होती, असे पुरी यांनी स्पष्ट केले. काॅंग्रेसचे सदस्य शशी थरुर यांनी स्मार्ट शहर योजनेत विसंगती व अनियमिता असल्याचा आरोप चर्चेत सहभाग घेताना केला होता. थरुर यांनी वाराणसी व छत्तीसगडमधील अटल नगर या शहरांची उदाहरणे देत वाराणसीतील बहुतांशी सर्व कामे पूर्ण होत आल्याचे तर अटल नगरमध्ये जुजबी काम झाल्याचे सांगितले.

हेही वाचा :
SCROLL FOR NEXT