Sanjay Raut On Amit Shah pudhari
राष्ट्रीय

Sanjay Raut On Amit Shah: गृहमंत्र्यांच्या तोंडी ज्ञानेश कुमारांची भाषा.... आता 'प्रकट' होण्यावरून संजय राऊतांचे चिमटे

गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक दिवसांनंतर माध्यमांशी बोलताना दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत मत व्यक्त केलं.

Anirudha Sankpal

Sanjay Raut On Amit Shah: गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक दिवसांनंतर माध्यमांशी बोलताना दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत मत व्यक्त केलं. त्यांनी राहुल गांधी यांच्या एसआयआरमुळे भाजप जिंकते या आरोपावर देखील प्रत्युत्तर दिलं. तसेच २०२९ मध्ये देखील आम्हीच जिंकणार असा विश्वास २०२६ मध्येच व्यक्त केला. यावरून आता संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत गृहमंत्री अमित शहा यांना चिमटे काढले.

संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले, 'गृहमंत्री अमित शहा बऱ्याच दिवसांनी प्रकट झाले. एवढे दिवस ते भूमिगत होते. निवडणूक आयोग लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत आहेत. या आंदोलनाकडून लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत.'

गर्दी कमी तर अडीच लाख फौजफाटा कशासाठी

अमित शहांच्या प्रतिक्रियावर बोलताना राऊत म्हणाले, 'तोंड बंद असलेले अमित शहा काल प्रकट झाले. ते म्हणतात सोमवारच्या मोर्चात ८ हजार लोकं होती. मला याचं वाईट वाटलं. त्यांची नजर कमजोर झाली आहे. ते डिप्रेशनमध्ये गेले आहेत. त्यांनी चष्मा बदलावा, आरोग्य मंत्र्यांनी त्यांच्याकडे डॉक्टर पाठवावेत. जर लोक एवढे कमी असतील तर मग अडीच लाख पोलीस कशाला पाठवले.

ही तर ज्ञानेश कुमारची भाषा

अमित शहा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आम्ही २०२९ मध्ये जिंकू असा विश्वास व्यक्त केला होता. त्यावर देखील टोमणा मारताना राऊत म्हणाले की, ते म्हणत आहेत आम्ही २०२९ मध्ये जिंकू. त्यांच्या तोंडी ज्ञानेश कुमारची भाषा आहे. ही ज्ञानेश कुमारची भाषा आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी आमच्या शुभेच्छा. तुम्हाला आंदोलनाची भय वाटत नाही तर मग जंतर मंतरचे ठिकाण का बदलले. त्याला तुम्ही टाळं का ठोकलं ते सांगा.

मी घुसखोर आहे का?

संजय राऊत यांनी हा संघर्ष थांबणार नाही. वेगवेगळी आंदोलने सुरूच राहतील. प्रत्येकवेळी मोर्चा काढला जाईल असं नाही. लोकांना या विषयाचं गांभिर्य आम्ही लक्षात आणून देऊ. अमित शहा यांनी घुसखोरांची नावे वगळल्याचे वक्तव्य केलं. त्यावर राऊत म्हणाले की, मी घुसखोर आहे का? माजी निवडणूक आयुक्त कुरेशी यांचे नाव वगळले. त्याचं उत्तर द्यावं. अमित शहा यांची हीच घुसखोरीची व्याख्या आहे. ज्ञानेश कुमार हा माफिया तर सीमा खन्ना ही लेडी डॉन आहे. अमित शहा न्यायमूर्ती अभय ओक यांना देखील घुसखोर ठरवणार आहेत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT