Sanjay Raut CEC Protest: दिल्लीतील आंदोलनावेळी संजय राऊत यांना आली भोवळ... अनेक खासदारांना श्वसनाचा त्रास

राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांंच्यासह अनेक खासदारांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं.
Sanjay Raut on Mumbai Mayor
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत.File Photo
Published on: 
Updated on: 

Sanjay Raut CEC Protest: दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यलयावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन विरोधी खासदारांचा मोर्चा आज धडकला. मात्र या आंदोलनावेळी शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि मुलूख मैदानी तोफ संजय राऊत यांना भोवळ आले. संजय राऊत यांच्याबरोबरच अजून काही खासदारांना श्वसानाचा त्रास झाल्याचे वृत्त आहे.

Sanjay Raut on Mumbai Mayor
Sanjay Raut : "केवळ ज्ञानेश कुमार पदावरून पायउतार होणार नाहीत..." : गर्जना मोर्चावर संजय राऊत काय म्हणाले?

दिल्लीत जोरदार आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षाचे लोकसभा आणि राज्यसभा खासदार हे दिल्लीतील मुख्य निवडणूक कार्यालयावर मोर्चा काढला होता. पोलिसांनी या खासदारांना रस्त्यातच आडवल्यानंतर विरोधीपक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांंच्यासह अनेक खासदारांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. यानंतर पोलिसांनी त्यांना तिथून हटवण्याचा प्रयत्न केला.

Sanjay Raut on Mumbai Mayor
Sanjay Raut Political Earthquake: आता भूगर्भातील हालचाली सुरू.. जानेवारी देशात मोठा राजकीय भूकंप; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

संजय राऊत घरी परतले

पोलिसांनी सर्व आंदोलन खासदारांना ताब्यात घेतले होते. मात्र काँग्रेसचे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा हे गाडीतून उतरून आकाशवाणी भवनमध्ये गेले. त्यांनी तिथे झाडाखाली ठिय्या मांडला आहे. पोलिसांनी तिथून राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेण्यात आलं.

वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शाम कुमार बरगे यांना धक्काबुक्की झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर ऊन असून अनेक लोकांची गर्दी झाल्यामुळं त्यांना त्रास झाला. संजय राऊत हे त्रास झाल्यानंतर घरी परतल्याचं कळतंय.

Sanjay Raut on Mumbai Mayor
Sanjay Raut Letter: एफडीएच्या कारवाईमुळे अधिकार्‍यांचे रेटकार्ड वाढले; संजय राऊत यांचे तुकाराम मुंढे यांना पत्र

राहुल - प्रियांकांचा अजूनही ठिय्या

दुसरीकडे मुंबईत पोलिसांनी आदिवासी विद्यार्थ्यांना देखील ताब्यात घेतलं आहे. हे विद्यार्थी काँग्रेसच्या टिळक भवन इथं थांबली होती. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यावेळी देखी जोरदार गदारोळ झाला.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांनी आकाशवाणी भवनात ठिय्या मांडला असून पोलीस त्यांच्याशी चर्चा करत आहेत. या दोघांनाही सुरक्षा पुरवण्यात आली असल्यामुळं पोलिसांना त्यांना थेट ताब्यात घेता येत नाही. गेल्या आंदोलनावेळी देखील राहुल गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांनी दिल्ली पोलिसांना विरोध केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news