

मुंबई: दिल्लीत सीजेपीच्या लोकांना ताब्यात घेतले म्हणून काही आंदोलन थांबले नाही. दिल्लीत पोलिसांचे राज्य असून आज देशात आणीबाणी लागली आहे हे मान्य केले पाहिजे, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली.
हिटलरने त्याच्या अखेरच्या काळामध्ये याच पद्धतीचे वर्तन जर्मनीमध्ये केले होते. आंदोलने दडपणे, विरोधकांना अटक करणे, लोकांना घरात कोंडून ठेवणे आणि लॉकडाऊन लावणे हे हिटलरने विरोधक त्याच्या जुलमी राजवटीविरोधात रस्त्यावर उतरले तेव्हा केले होते, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांचे सरकार पुढच्या सहा ते सात महिन्यांत दिसणार नाही. आता त्यांचे राज्य बंदुकीच्या बळावर सुरू आहे.
पण मार्च-एप्रिलमध्ये मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. मोदी-शहांविरोधातील ही खदखद केवळ विरोधकांमध्ये आहे असे नाही, तर भारतीय जनता पक्षामध्येसुद्धा अशी खदखद तुम्हाला दिसू लागेल. मार्च, एप्रिल महिन्यात देशामध्ये राजकीय परिवर्तन होईल.