नवी दिल्ली : प्रेम, द्वेष आणि सूड... या तीन शब्दांभोवती फिरणारी एक धक्कादायक घटना दिल्लीत उघडकीस आली आहे. प्रेमात मिळालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी एका AI इंजिनिअरने आपल्या एक्स-गर्लफ्रेंडलाच आंतरराष्ट्रीय पॉर्न स्टार बनवून टाकले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून त्याने हे भयंकर कृत्य केले. ही घटना तंत्रज्ञानाच्या गैरवापराच्या गंभीर धोक्यांकडे लक्ष वेधत आहे.
या प्रकरणातील आरोपी प्रीतम बोरा हा मूळचा आसामचा असून तो दिल्लीत मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून काम करतो. त्याचे आसाममधीलच एका तरुणीवर प्रेम होते. मात्र, तिने कथितरित्या त्याचा वारंवार अपमान केला होता. याच अपमानाचा बदला घेण्याच्या विचाराने तो इतका पेटून उठला की, त्याने तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर करत सूडाचा एक नवा भयानक मार्ग निवडला.
ही संपूर्ण कथा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) गैरवापराचा एक मोठा इशारा आहे. आपल्या माजी प्रेयसीकडून बदला घेण्यासाठी प्रीतमने तिच्या जुन्या फोटोंचा वापर केला. या फोटोंच्या आधारे त्याने AI च्या मदतीने तिचे अनेक अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार केले. सुरुवातीला केवळ वैयक्तिक सूड म्हणून सुरू झालेला हा प्रकार, लवकरच पॉर्न इंडस्ट्रीतून नफा कमावण्याच्या व्यवसायात बदलला.
डिजिटल युगात 'रिव्हेंज पॉर्न' ही गोष्ट नवीन नाही, परंतु एका इंजिनिअरने AI च्या मदतीने माजी प्रेयसीचे बनावट पॉर्न कंटेंट तयार केला. जेव्हा प्रीतमच्या लक्षात आले की AI द्वारे तयार केलेल्या लैंगिक कंटेंटमधून व्यावसायिक नफा मिळू शकतो, तेव्हा त्याने या कंटेंटद्वारे पैसे कमावण्यास सुरुवात केली.
प्रीतमने आपल्या माजी प्रेयसीची 'बेबीडॉल आर्ची' (Babydoll Archie) या नावाने एक बनावट ऑनलाइन ओळख तयार केली आणि AI ने बनवलेले सर्व कंटेंट पॉर्नोग्राफी वेबसाइट्सवर अपलोड करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता या प्रोफाइलची लोकप्रियता प्रचंड वाढली आणि अनेक लोकांना वाटू लागले की, आसामची ही मुलगी खरोखरच अमेरिकन प्रौढ मनोरंजन उद्योगात (American Adult Entertainment Industry) पाऊल ठेवत आहे.
आर्चीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केल्यानंतर चर्चा अधिकच वाढली ज्यामध्ये ती लोकप्रिय प्रौढ मनोरंजन स्टार केंद्रा लस्टसोबत दिसत होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या इतर सर्व फोटोंप्रमाणेच हे फोटोही एआय जनरेटेड फोटो होते. बोराने केंद्रा लस्टला हे फोटो कसे शेअर केले हे चौकशीनंतरच उघड होईल.
सुमारे ८२ हजार फॉलोअर्स असलेल्या या हँडलचे फॉलोअर्स काही दिवसांत १२ लाख झाले. यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्यानंतर लक्षात आले की बेबीडॉल आर्ची नावाच्या हँडलवरून पोस्ट करणारी आसामची मुलगी खरी व्यक्ती नाही तर एक डिजिटल व्यक्तिमत्व आहे.