shocking murder investigation
मैनपुरी : अनैतिक संबंध हे केवळ नात्याला काळिमा फासताच मात्र अशा कृत्यातून माणसं जिवंतपणीच स्वतःच्या कुटुंबाची राख रांगोळी करतात. मुलांचे भविष्य आणि घराची प्रतिष्ठा कायमची धुळीस मिळते. असाच प्रकार नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील मैनुपरी येथे एका ३२ वर्षीय महिल्या मृत्यूचे गूढ उकलताना समोर आला आहे.
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील करहल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ३२ वर्षीय महिलेच्या मृत्यूचे धक्कादायक गूढ उकलले आहे. ज्याला रक्षक मानले जात होते, तोच भक्षक निघाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आपल्याच भाच्याच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून आणि मत्सरातून मामे सासऱ्याने सुनेची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी धर्मेंद्र कुमार याला बेड्या ठोकल्या आहेत.
११ जानेवारी रोजी करहल पोलीस स्टेशन परिसरातील एका गावाबाहेर जांभळाच्या झाडाला एका महिलेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला.
धर्मेंद्रने पीडितेला चर्चेसाठी बोलावले, जिथे त्यांच्यात जोरदार वाद झाला. संतापलेल्या धर्मेंद्रने तिचा गळा दाबून खून केला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने पीडितेच्याच साडीने तिचा मृतदेह झाडाला लटकवून दिला, हा प्रकार सर्वांना आत्महत्या वाटेल, असा बनावही रचला. शवविच्छेदन अहवालात महिलेचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर मैनपुरीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अजय सिंग चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला. अवघ्या काही दिवसांतच या गुन्ह्याचा छडा लावला.
अटक करण्यात आलेला आरोपी धर्मेंद्र कुमार हा मृत महिलेचा नात्याने मामे सासरा लागतो. पोलीस चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार महिन्यांपासून त्याचे आपल्या भाच्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. पीडित महिला तिच्या जुन्या प्रियकराच्या संपर्कात असल्याचा संशय धर्मेंद्रला होता. १० जानेवारीच्या रात्री त्याने पीडितेला शेजाऱ्याशी बोलताना पाहिले. यावर तो भडकला त्याने महिलेचा काटा काढण्याचा कट रचला. पोलिसांनी धर्मेंद्रला मानपूर परिसरातून अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.