Delhi Red Fort Blast pudhari photo
राष्ट्रीय

Delhi Red Fort Blast: दिल्ली ब्लास्टमध्ये नवा खुलासा! गाडी 3 तास सुनहरी मस्जिद जवळ होती थांबली

दिल्ली पोलीस जवळपासचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत असून ब्लास्टमध्ये वापरण्यात आलेली आय २० कार ही कुठ कुठं गेली होती याचा शोध घेत आहेत.

Anirudha Sankpal

Delhi Red Fort Blast:

सोमवार (दि. १० नोव्हेंबर) देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ कार ब्लास्ट झाला. या ब्लास्टनंतर शेजारील गाड्यांना देखील आग लागली. या स्फोटात ८ लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, दिल्ली पोलीस एएनआय या ब्लास्टसंदर्भातील तपास करत आहेत. दिल्ली पोलीस जवळपासचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत असून ब्लास्टमध्ये वापरण्यात आलेली आय २० कार ही कुठ कुठं गेली होती याचा शोध घेत आहेत.

दिल्ली पोलिसांनी फोटो केले प्रसिद्ध

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही आय २० गाडी १० नोव्हेंबरला दुपारी ३.१९ च्या दरम्यान पार्किंगमध्ये दाखल झाली होती. त्यानंतर ती सायंकाळी ६.४८ वाजता पार्किंगकमधून बाहेर पडली. त्यानंतर अवघ्या ४ मिनिटात म्हणजे ६ वाजून ५२ मिनिटांनी सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नवर पोहचल्यानंतर या गाडीत मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तीशाली होती की त्याचमुळं आजूबाजूच्या गाड्यांनी देखील पेट घेतला. यामध्ये ८ लोकांचा मृत्यू झाला असून २० लोक जखमी झाले आहेत.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ब्लास्टच्या आधीची काही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यामध्ये ही आय २० गाडी सुनहरी मस्जिदच्या जवळ रस्त्यावर थांबलेली दाखवली आहे. ही गाडी लाल किल्ल्याच्या जवळ नेताजी सुभाष चंद्र बोस मार्गावरील ट्रॅफिक सिग्नलवर संथ गतीनं जात असताना गाडीच्या पाठीमागच्या भागात (डिक्की) जोरदार विस्फोट झाला. या स्फोटामुळ लाल किल्ला मेट्रो स्टेशनची काच देखील फुटली.

विशेष म्हणजे ही गाडी गुरूग्राम नॉर्थ आरटीओ पासिंगची होती. त्याचा नंबर हा HR - 26 -7624 हा होता. ही गाडी मोहम्मद सलमानच्या नावावर रजिस्टर आहे. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. तपासात पुलवामा कनेक्शन देखील समोर आलं आहे. सलमान यांनी ही आय २० कार जम्मू काश्मीरच्या तारिक नावाच्या व्यक्तीला विकली होती.

गाडीची अनेकवेळा खरेदी विक्री

या घटनेत वापरण्यात आलेली ही आय २० गाडीची अनेकवेळा खरेदी अन् विक्री झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी खरेदी विक्री करताना खोटी कागदपत्रे वापरण्यात आली होती. त्यामुळं सुरक्षा यंत्रणांना या प्रकरणात वेगळा संशय येत आहे. विशेष म्हणजे या गाडीचा १५ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजता फरिदाबादमध्ये चुकीचं पार्किंग केल्यामुळं १७२३ रूपयाचं चलन देखील करण्यात आलं होतं. त्यामुळं हे संपूर्ण प्रकरणच संशयाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. ९ नोव्हेंबर रात्री फरिदाबाद पोलिसांनी फरिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील केमिकल पकडलं होतं. या केमिकलचा विस्फोटकांमध्ये वापर होतो.

फरिदाबादशी जुळतंय कनेक्शन

सुरक्षा दलांनी दिल्ली ब्लास्टचे कनेक्शन फरिदाबाद इथून आईडी तयार करायचं सामान जप्त केलं होतं. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा देखील जप्त केला होता. ज्यांच्याकडून हे सामान जप्त करण्यात आलं. त्याचे जैश ए मोहम्मद आणि अंसर गजवात उल हिंद या संघटनांशी कनेक्शन जुळलं होतं. जम्मू काश्मीर पोलिसांनी या दहशतवादी मॉड्यूल उडेजाच आणत सात लोकांना अटक केली होती. यात दोन डॉक्टरांचा देखील समावेश आहे. त्यातील मुअजमिल अहमद गनईचा संबंध हा फरिदाबादशी आहे.

डॉक्टरच्या घरात मिळालं ३६० किलो अमोनियम नायट्रेट

फरीदाबाद येथून ताब्यात घेतलेल्या डॉक्टर मुअजमिलच्या घराजून ३६० किलो अमोनियम नायट्रेट, एक एके ४७ राफयल, एके क्रिनकोव्ह, परेटा पिस्टल, चीनी स्टार पिस्टल आणि शेकडो काडतुसं मिळाली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार अटक केलेले हे सर्वजण व्हाईट कॉलर टेरर नेटवर्कचा भाग होते. हे उच्चशिक्षित प्रोफेशनल्स दहशतवाद्यांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य पुरवता होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT