अयोध्‍या राम मंदिर (Ram Mandir Donation Theft Case)  File Photo
राष्ट्रीय

Ram Mandir Donation Theft : सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेली नवीन SIT ॲक्शन मोडमध्ये; २०० जणांना नोटिसा

माजी पदाधिकारी चंपत राय, अनिल मिश्रा यांची पुन्हा होणार चौकशी

पुढारी वृत्तसेवा

Ram Mandir Donation Theft Case

नवी दिल्‍ली पुढारी वृत्तसेवा : अयोध्या येथील श्री राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाच्‍या तपासाला आता गती आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या नवीन विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणाचा तपास गतिमान केला आहे. तपासाच्या या नव्या टप्प्यात एसआयटीने तब्बल २०० हून अधिक जणांना चौकशीसाठी नोटिसा बजावली आहे.

२०० जण एसआयटीच्या रडारवर

अयोध्या येथील श्री राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाच्‍या तपासाची व्‍याप्‍ती आता वाढवली गेली आहे. एसआयटीने मंदिर परिसरातील दान मोजणी प्रक्रिया, सुरक्षा व्यवस्था आणि इतर दैनंदिन व्यवस्थापनाशी संबंधित सुमारे २०० कर्मचाऱ्यांना व संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. या सर्व घटकांची कसून चौकशी केली जात असून देणगी प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याचा बारकाईने आढावा घेतला जात आहे.

माजी पदाधिकारी चंपत राय, अनिल मिश्रा यांची पुन्हा होणार चौकशी

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची घडामोडी म्हणजे ट्रस्टचे राजीनामा दिलेले माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनाही नवीन एसआयटीने पुन्हा नोटीस बजावली आहे. त्यामुळे या दोन्ही माजी उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांची एसआयटीकडून कोणत्याही क्षणी चौकशी होणार आहे. पूर्वतपासात राहिलेले दुवे शोधण्यासाठी ही चौकशी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

आर्थिक गैरव्यवहाराचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिट तज्ज्ञ

श्री राम मंदिरातील देणगीच्या रकमेत नेमका किती आणि कसा गैरव्यवहार झाला, याचा शास्त्रीय आणि कायदेशीर पुरावा गोळा करण्यासाठी एसआयटीने विशेष रणनीती आखली आहे. या तपासात आता चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) म्हणजेच फॉरेन्सिक ऑडिट तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.मंदिराच्या सर्व आर्थिक नोंदी, जमा-खर्च आणि बँकेचे व्यवहार यांचे फॉरेन्सिक ऑडिट केले जाणार आहे. यामुळे नेमका देणगी चोरी कशी झाली याची सखोल माहिती समोर येणार आहे.

सर्व ८ आरोपींना पोलिस कोठडी

प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आतापर्यंत सर्व आठही आरोपींना पोलिस कोठडीत घेऊन त्यांची सखोल चौकशी केली आहे, तसेच तपासादरम्यान महत्त्वाचे पुरावेही जप्त केले आहेत. यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने ('एसआयटी') या प्रकरणाचा तपास करून सर्वोच्च न्यायालयात आपला स्टेटस रिपोर्ट (तपास अहवाल) सादर केला होता. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर उच्चस्तरीय 'एसआयटी' स्थापन

न्यायालयाच्या निर्देशानंतर स्थापन करण्यात आलेल्या या नवीन 'एसआयटी'चे प्रमुखपद लखनऊ रेंजचे पोलिस महानिरीक्षक (आयजी) किरण एस. यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या पथकात अयोध्या रेंजचे पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) सोमेन वर्मा आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) डॉ. गौरव ग्रोवर यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT