Ram Mandir Donation pudhari
राष्ट्रीय

Ram Mandir Donation: अयोध्येतील राम मंदिरातील 'दान' मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईकही रडारवर.. SIT चौकशीत त्यांचीही समावेश

Anirudha Sankpal

Ram Mandir Donation Controversy: उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी विशष तपास पथकाची नेमणूक केली आहे. या एसआयटीने सोमवारी सकाळी मंदिर परिसरात पोहचली. त्यांनी दान मोजणाऱ्या विभागातूनच आपल्या तपासाची सुरूवात केली आहे.

एसआयीने श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी आणि त्यांचे पत्ते देखील मागवून घेतली. तसेच गेल्या वर्षी दान मोजण्याच्या प्रक्रियेत सामील असलेल्या लोकांची देखील माहिती मागवली आहे.

सखोल तपास करणार

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंदिरात काम मिळाल्यापासून या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांची संपत्ती आणि आर्थिक प्रगती देखील तपासाच्या कक्षेत आली आहे. या एसआयचीचे नेतृत्व लखनौ विभागाचे आयुक्त विजय विश्वास पंत करत आहेत. या पथकात लखनौ रेंजचे आयजी किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नीलरत्न कुमार यांचा देखील समावेश आहे. किरण एस हे नुकतेच सीबीआयचे डेप्युटेशन पूर्ण करून आले आहेत. तर नीलरत्न यांना अकाऊंटिंगच्या कामाचा अनेक वर्षाचा अनुभव आहे.

सरकारने स्थापन केली SIT

राम मंदिर ट्रस्टने भाविकांनी दान केलेल्या पैशाची चोरी झाल्याच्या प्रकरणी सरकारकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने ७ दिवसात प्राथमिक आणि १५ दिवसात पूर्ण अहवाल देण्यास सांगितलं आहे. सरकारने फक्त कथित हेराफेरी नाही तर पूर्ण व्यवस्थेची तपासणी करण्यासाठीच एसआयटी स्थापन केली असून ते सर्व अँगलने या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

यात मोजणी कार्यालयातील फुटेज, दान पेटीतून दान काढल्यानंतर ते कक्षात घेऊन जाणे आणि मोजणे, ते बँकेत जमा करणे या संपर्ण प्रक्रियेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. तसेच या प्रक्रियेत येणारे सर्व लोक आता तपासाच्या कक्षेत येणार आहेत.

काँग्रेसची टीका

राम मंदिर चोरी प्रकरणानंतर राजकीय बॅनरबाजी देखील सुरू झाली आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद शुक्ला यांनी अयोध्येत पोस्टर लावले. त्यात त्यांनी स्कंद पुराणाचा हवाला देत मंदिराचे दान जमीन किंवा संपत्ती चोरी करणाऱ्याला ६० हजार वर्षे नरकात किड्याचे जीवन जगावे लागणार आहे. शुक्ला यांनी श्रीरामलला न्याय करतील असं देखील पोस्टरवर लिहलं आहे.

राम मंदिर आंदोलनाशी जोडलेल्या धर्म सेना प्रमुख संतोष दुबे यांनी आरोप केला कील चंपत राय यांच्याशी संबंधित ड्रायव्हर टुन्नू यादवची चार वर्षात करोडोची संपत्ती झाली आहे. त्याचा पगार काही हजार रूपयेच होता. त्याने ६० खोल्यांचा महाल बांधला आहे त्यात लिफ्ट देखील आहे असा दावा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT