राष्ट्रीय

NDA Cabinet 3.0 : राजनाथ सिंह, अमित शहांसह ‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : NDA Cabinet 3.0 : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज (दि.९) सायंकाळी राष्‍ट्रपती भवनात पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी म्रुमू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर कॅबिनेट मंत्रीपदी राजनाथ सिंह आणि अमित शहा यांनी  शपथ घेतली.

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज (दि.९) सायंकाळी राष्‍ट्रपती भवनात पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र माेदी हे तिसरे पंतप्रधान ठरले आहेत.

पंतप्रधान- नरेंद्र मोदी

केंद्रीय मंत्री

राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जगत प्रकाश नड्डा, शिवराज सिंह चव्हाण, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर, मनोहरलाल खट्टर, एच. डी. कुमारस्वामी (धर्मनिरपेक्ष जनता दल), पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, जितन राम मांझी (हिंदूस्थान अवाम मोर्चा), राजीव ललन सिंह (संयुक्त जनता दल), सर्वानंद सोनोवाल, डॉ. वीरेंद्र कुमार, आर. पी. नायडू (तेलगू देसम पक्ष),प्रल्हाद जोशी, जुयल ओरवन, गिरीराज सिंह, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य शिंदे, भुपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत,अन्नपूर्णा देवी, किरेण रिजिजू, हरदीप सिंह पुरी, मनसुख मंडाविया, जी. किशन रेड्डी, चिराग पासवान (लोजपा) ,सी. आर. पाटील

राज्यमंत्री

जितिन प्रसाद (भाजप), श्रीपाद नाईक (भाजप), किशन पाल गुर्जर (भाजप), पंकज चौधरी (भाजप), रामदास आठवले (आरपीआय), रामनाथ ठाकूर (जदयू), नित्यानंद राय (भाजप), अनुप्रिया पटेल (अपना दल), व्ही. सोमन्ना (भाजप), चंद्रशेखर पेम्मासानी (टीडीपी), एसपी सिंग बघेल (भाजप), शोभा करंदलाजे (भाजप), कीर्तीवर्धन सिंग (भाजप), बीएल वर्मा (भाजप), शंतनू ठाकूर (भाजप), सुरेश गोपी (भाजप), एल. मुरुगन (भाजप), बंदी संजय कुमार (भाजप), अजय टमटा (भाजप), भगीरथ चौधरी (भाजप), कमलेश पासवान (भाजप), सतीशचंद्र दुबे (भाजप), संजय सेठ (भाजप), रवनीत सिंग बिट्टू (भाजप), दुर्गा दास उईके (भाजप), रक्षा खडसे (भाजप), सुकांता मजुमदार (भाजप), सावित्री ठाकूर (भाजप), तोखान साहू (भाजप), राजभूषण चौधरी (भाजप), भूपती राजू श्रीनिवास वर्मा (भाजप), हर्ष मल्होत्रा (भाजप), निमुबेन बांभनिया (भाजप), मुरलीधर मोहोळ (भाजप), जॉर्ज कुरियन (भाजप), पवित्रा मार्गेरिटा (भाजप)

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

राव इंद्रजीत सिंह ,डॉ. जितेंद्र सिंह, अर्जुन राम मेघवाल, प्रतापराव जाधव (शिवसेना-शिंदे गट), जयंत चौधरी (राष्ट्रीय लोक दल)

नरेंद्र मोदी यांनी आज देशाचे पंतप्रधान म्‍हणून तिसर्‍यांदा शपथ घेतली. नुकत्‍याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत. एनडीए आणि भाजपाचे संसदीय नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड झाली होती. त्यानंतर रविवारी शपथविधी सोहळा पार पडला. बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशस आणि सेशेल्स यांसारख्या शेजारील देशाचे प्रमख यांच्‍यासह विविध क्षेत्रातील तब्बल 8,000 पाहुणे शपथविधीला उपस्थित आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT