प्रातिनिधिक छायाचित्र.  Pudhari News
राष्ट्रीय

Railway Track Blast : राजस्थानमधील रेल्वे ट्रॅक स्फोट प्रकरणी पाकिस्तानी 'कनेक्‍शन' आले समोर; महिलेसह दोघे अटकेत

Rajasthan railway track blast : संशयित आरोपींकडून दोन पिस्‍तुलासह ४० काडतूसे जप्‍त

पुढारी वृत्तसेवा

Rajasthan railway track blast arrests : राजस्थानच्या श्री गंगानगर जिल्ह्यात रेल्वे रुळावर ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटाच्या प्रकरणाशी पंजाबमधून दोन व्यक्तींना राजस्थान दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अटक केली आहे. यामध्‍ये एका महिलेचाही समावेश आहे. आरोपी 'शाह' नावाच्या एका पाकिस्तानी एजंटच्या सूचनेवरून काम करत होते, असा संशय पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे. देवेंद्र सिंग आणि महकदीप कौर अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. हे दोघेही गुरदासपूरचे रहिवासी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

संशयित आरोपींकडून दोन पिस्‍तुलासह ४० काडतूसे जप्‍त

३ नोव्हेंबर रोजी राजस्थानच्या श्री गंगानगर भागातील अनुपगड-सुरतगड रेल्वे मार्गावर, '५० जीबी' गावाजवळ रेल्वे ट्रॅकवर बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणाच्‍या तपासादरम्यान, राजस्थान पोलिसांना पंजाब सीमेजवळील गावांत काही संशयित व्यक्ती असल्याची माहिती मिळाली. राजस्थान पोलिसांच्या एका पथकाने गुरदासपूर जिल्ह्यातील कलानौर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दोस्तपूर पोलीस चौकीच्या मदतीने दोस्तपूर गावातील तरलोक सिंग यांची मुलगी महकप्रीत कौर (२४) आणि जवळच्या चौडा कलान या सीमावर्ती गावातील रविंदर सिंग यांचा मुलगा दविंदर सिंग यांना ताब्यात घेतले.

सखोल तपास सूरु

पोलीस सूत्रांनुसार, संशयितांकडून एक 'बेरेटा' ९ मिमी पिस्तूल, एक .३०-बोर पिस्तूल आणि सुमारे ४० काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. रेल्वे मार्गावरील स्फोटात त्यांचा सहभाग आहे का, तसेच जप्त केलेली शस्त्रे कोठून आली आणि ती त्यांच्याकडे कशी आली, याचा तपास पोलीस करत आहेत.

यापूर्वी दोनवेळ रेल्‍वे मार्ग उडवून देण्‍याचा प्रयत्‍न

याआधीही स्फोट घडवून आणण्याचे दोन प्रयत्न अयशस्वी झाले होते. गुरदासपूरचे एसएसपी आदित्य यांनी सांगितले की, दोन्ही आरोपी तीन वेळा राजस्थानला गेले होते. पहिल्या वेळी त्यांना आवश्यक साहित्य मिळवण्यात अपयश आले, तर दुसऱ्या वेळी ते स्फोट घडवून आणण्यात अयशस्वी ठरले.

तिसर्‍या प्रयत्‍नात रेल्‍वे मार्गावर घडविला स्‍फोट

सखोल तपासानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. एसएसपींच्या माहितीनुसार, तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी स्फोट घडवून आणला. या प्रकरणात सहभागी असलेल्या तरुणीला पाकिस्तानात राहणाऱ्या 'शाह' नावाच्या व्यक्तीकडून एक लाख रुपये मिळाले होते. या रकमेपैकी ३०,००० रुपये जप्त करण्यात आले आहेत. गुरदासपूर जिल्हा पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. ठोस माहिती मिळाल्यानंतर, ती राजस्थान पोलिसांसोबत शेअर करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT