Minor Girl Assaulted File Photo
राष्ट्रीय

Minor Girl Assaulted: मन सुन्न करणारी घटना! अल्पवयीन गर्भवती मुलीवर सामूहिक अत्याचार, प्रसूतीनंतर काही वेळातच बाळाचा मृत्यू

एका अल्पवयीन गर्भवती मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. प्रसूतीसाठी पीडिता रुग्णालयात पोहोचली असता हा प्रकार उघडकीस आला.

पुढारी वृत्तसेवा

Minor Girl Assaulted

दौसा: राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात एका अल्पवयीन गर्भवती मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. प्रसूतीसाठी पीडिता रुग्णालयात पोहोचली असता हा प्रकार उघडकीस आला. तिने एका बाळाला जन्म दिला; मात्र, प्रसूतीनंतर काही वेळातच त्या बालकाचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलवा पोलीस ठाणे हद्दीतील एका १६ वर्षीय पीडित मुलीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, काही युवकांनी तिचे अपहरण केले होते. त्यानंतर तिला दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे जवळ एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

या दरम्यान पीडितेला प्रसूतीकळा सुरू झाल्या आणि तिने त्याच ठिकाणी एका बालकाला जन्म दिला. या भीषण प्रसंगानंतर पीडित मुलगी कशीतरी एका रुग्णालयात पोहोचली, जिथे डॉक्टरांनी नवजात बालकाला मृत घोषित केले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.

दौसाचे पोलीस अधीक्षक कुंदन कंवरिया यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अल्पवयीन मुलीचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एका पोलीस उपअधीक्षकांकडे सोपवण्यात आला आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.

प्राथमिक तपासात समोर आले आहे की, एका ओळखीच्या व्यक्तीने तिला मोटारसायकलवरून तिच्या घरून रुग्णालयात आणल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून, कसून चौकशी सुरू आहे. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT