File Photo
राष्ट्रीय

Railway ticket app| रेल्वेचे 'UTS' अ‍ॅप १ मार्चपासून होणार बंद! आता 'या' नव्या अ‍ॅपवरून करा तिकीट बुकिंग

गेल्या अनेक वर्षांपासून अनारक्षित तिकिटांसाठी UTS अ‍ॅपचा होत होता वापर

पुढारी वृत्तसेवा

Railway ticket booking app

नवी दिल्ली : १ मार्च २०२६ पासून 'UTS on Mobile' अ‍ॅप पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या तारखेनंतर या अ‍ॅपद्वारे तिकीट बुकिंग किंवा इतर कोणतीही सुविधा मिळणार नाही, असे भारतीय रेल्वेने स्‍पष्‍ट केले आहे.

'RailOne' अ‍ॅपवर शिफ्ट होण्‍याचे रेल्‍वेने केले आवाहन

रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासादरम्यान होणारी गैरसोय टाळण्यासाठी वेळेतच 'RailOne' अ‍ॅपवर शिफ्ट व्हावे. 'RailOne' हे रेल्वेचे नवीन अ‍ॅप असून यामध्ये तिकीट बुकिंगसह प्रवासाशी संबंधित सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

UTS अ‍ॅप का बंद होत आहे?

भारतीय रेल्वे आपल्या डिजिटल सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यावर भर देत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनारक्षित (General) तिकिटांसाठी UTS अ‍ॅपचा वापर होत होता. मात्र, प्रवाशांना वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या अ‍ॅप्सची गरज भासू नये, या उद्देशाने रेल्वेने आता सर्व सुविधा एकाच 'ऑल-इन-वन' अ‍ॅपमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे 'RailOne' अ‍ॅप?

  • 'RailOne' हा भारतीय रेल्वेचा एक नवीन डिजिटल उपक्रम आहे. या एकाच अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांना खालील सुविधा मिळतील:

  • अनारक्षित तिकीट (General Ticket) बुकिंग

  • आरक्षित तिकिटांची माहिती

  • प्रवासाचे नियोजन (Journey Planner)

  • रेल्वेच्या इतर अत्यावश्यक सेवा

  • आता प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी मोबाईलमध्ये अनेक अ‍ॅप्स ठेवण्याची गरज भासणार नाही.

१ मार्च २०२६ पासून जुने UTS अ‍ॅप पूर्णपणे निकामी होणार

रेल्वेने स्पष्ट केले आहे की, १ मार्च २०२६ पासून जुने UTS अ‍ॅप पूर्णपणे निकामी होईल. त्यानंतर केवळ 'RailOne' अ‍ॅपचाच वापर तिकीट बुकिंगसाठी करता येईल. त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारी गर्दी आणि तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी प्रवाशांनी आतापासूनच नवीन अ‍ॅप वापरण्यास सुरुवात करावी, असे आवाहनही करण्‍यात आले आहे.

असे डाऊनलोड करा 'RailOne' अ‍ॅप

  1. अँड्रॉइड युजर्स Google Play Store वरून हे अ‍ॅप डाऊनलोड करू शकतात.

  2. आयफोन युजर्स Apple App Store वरून हे अ‍ॅप इंस्टॉल करू शकतात.

  3. डाऊनलोड केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरने लॉग-इन करून आवश्यक माहिती भरा आणि सेवांचा लाभ घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT