Rahul Gandhi will go on a three-day visit to America
राहुल गांधी तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार file photo
राष्ट्रीय

राहुल गांधी तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-

लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच अमेरिकेला जाणार आहेत. त्यांचा दौरा तीन दिवसांचा आहे. या दौऱ्यादरम्यान ते डलास आणि वॉशिंग्टनला भेट देतील. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसने ही माहिती दिली. राहुल गांधी यांची अमेरिका भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या न्यूयॉर्क दौऱ्यापूर्वी होणार आहे.

इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी सांगितले की, राहुल गांधी ८ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील डलास शहराला भेट देणार आहेत. तर वॉशिंग्टनमध्ये ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणार आहेत. यादरम्यान राहुल गांधी भारतीय वंशाचे लोक, विद्यार्थी, व्यापारी, थिंक टँक आणि स्थानिक नेत्यांशी संवाद साधतील. पित्रोदा म्हणाले की, राहुल गांधी जेव्हापासून विरोधी पक्षनेते बनले, तेव्हापासून परदेशात स्थायिक झालेले भारतीय वंशाचे लोक, मुत्सद्दी, शिक्षणतज्ज्ञ, नेते, व्यापारी आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांकडून मोठ्या प्रमाणावर त्यांना येण्याची विनंती करण्यात आली.

डलास मध्ये राहुल गांधी टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञांशी संवाद साधणार असल्याची माहितीही पित्रोदा यांनी दिली. ते स्थानिक भारतीय समुदाय आणि काही 'टेक्नोक्रॅट्स'नाही भेटणार आहेत. डलास भागातील नेत्यांसोबत ते डिनरही करणार आहेत. दुसऱ्या दिवशी ते वॉशिंग्टन डीसीला जातील, जिथे ते थिंक टँक, नॅशनल प्रेस क्लब आणि इतरांसह विविध लोकांशी संवाद साधणार आहेत.

SCROLL FOR NEXT