Rahul Gandhi On Gokul pudhari
राष्ट्रीय

Rahul Gandhi On Gokul : ४ संचालक घुसवा, १२ चे १६ करा... भाजपची जनादेशात 'भेसळ' म्हणत राहुल गांधींची गोकुळच्या राजकारणात उडी

भाजप सरकारने गोकुळमध्ये दूध उत्पादकांची मते चोरली आहेत. जनादेशात भेसळ केली आहे असा आरोप केला आहे. - राहुल गांधी

Anirudha Sankpal

Rahul Gandhi On Gokul : कोल्हापुरातील दूध संघ गोकुळमधील सत्ता संघर्ष आता मुंबईतून दिल्लीपर्यंत पोहचला आहे. अख्ख्या महाराष्ट्राचे ज्याच्याकडे लक्ष लागून राहिले होते आता त्यात विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. त्यांनी ट्विट करून भाजप सरकारने गोकुळमध्ये दूध उत्पादकांची मते चोरली आहेत. जनादेशात भेसळ केली आहे असा आरोप केला आहे. त्यांनी पवन खेरा यांच्या ट्विटला प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी ट्विट करतात की, 'गोकुळ दूध उत्पादकांनी भाजपला हरलवं होतं. म्हणून भाजपनेच निवडणुकीनंतर नियमच बदलला. त्यांनी ४ संचालक घुसवले. १२ चे १६ केले अन् बहुमताची चोरी केली. दूध उत्पादकांची मत चोरी केली आहे. जनादेशात भेसळ केली. भाजप इतके हताश झाले आहे की तिला प्रत्येक ठिकाणी सत्ता वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जात आहे. दूध उत्पादकांनी मतं चोरणाऱ्यांना लक्षात ठेवावं. शेतकरी कधी काही विसरत नाही.'

राहुल गांधीना गोकुळचा विषय माहिती नाही

गोकुळचं राजकारण दिल्लीच्या पातळीवर पोहचल्यानंतर लगेचच मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया देत राहुल गांधीना गोकुळचा विषय माहिती नाही असा टोला मारला. त्यांनी १४ च्या कोरमचा तांत्रिक मुद्दा आहे. आम्ही विरोधातच आहोत. मात्र हा डेडलॉक फोडण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे असे माध्यमांशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी देखील आपण गोकुळचा विषय सोडणार नाही असं सुतोवाच दिले. ते आजच्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. न्यायलयीन लढाईसोबत रस्त्यावरची लढाई देखील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

पडलेल्या उमेदवारांना मिळणार एन्ट्री?

गोकुळचा चेअरमन कोण होणार याचा निर्णय १० तारखेला होत असलेल्या सभेवेळी होण्याची शक्यता आहे. त्यातच शासनाने ५ शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार असल्याचा नवीन नियम केल्यामुळं आता चेअरमन निवडीत मोठा ट्विस्ट आला आहे.

सरकारच्या नव्या नियमामानुसार पाच शासन नियुक्त संचालकांपैकी चार संचालकांना मतदानाचा अधिकार असेल. मात्र त्यांना कोणतेही पद घेता येणार नाही. महायुतीकडून निवडणुकीत हरलेल्या नविद मुश्रीफ, शौमिका महाडिक यांची शासन नियुक्त संचालकांमध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT