Rahul Gandhi Press Conference On Vote Chori :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत कर्नाटकमधील आलंद येथील मतदार डिलीट करण्यावरून गंभीर आरोप केले. त्यांनी दावा केला की जवळपास या बूथवरील ६ हजारांपेक्षा जास्त मतदार हे सॉफ्टवेअरच्या मदतीनं डिलीट करण्यात आले आहेत. याबाबत कर्नाटक सीआयडीनं निवडणूक आयोगाला १८ वेळा पत्र लिहिली आहेत. मात्र निवडणूक आयोगानं यावर उत्तर दिलेलं नाही असं देखील राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी देशात मतदार डिलीट करणे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. असं सांगितलं आजच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत जे लोकं या मतदार डिलीट करणाऱ्यांना पाठिशी घालत आहेत. ते सर्व लोकं देशाच्या लोकशाहीची हत्या करत आहेत असा आरोप केला. दरम्यान, राहुल गांधी पत्रकार परिषद झाल्यावर सांगितलं की हा काही हायड्रोजन बॉम्ब नाहीये. आम्ही त्यावर काम करत आहोत. लवकरच तो टाकू!
राहुल गांधी यांनी कशा प्रकारे पद्धतशीर मतदार डिलीट केले जातात हे सविस्तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर केल्यानंतर अजून एक खुलासा केला. ते म्हणाले, 'हा काही हायड्रोजन बॉम्ब नाहीये. तो तयार होत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आम्ही तुम्हाला हायड्रोजन बॉम्ब दाखवू त्याच्यावर अजून काम सुरू आहे.'
ते पुढे म्हणाले, 'मी माझ्या टीमला सांगितलं आहे की मला ज्यावेळी स्टेजवर जायचं आहे त्यावेळी माझ्याकडं सबळ पुरावे हवेत. जर ते पुरावे नसतील तर मी पत्रकार परिषद घेणार नाही. मी माझ्या टीमला सांगितलं आहे की माझ्याकडे असे पुरावे हवेत जे कोणीही नाकारू शकणार नाही. त्यानंतरच मी हायड्रोजन बॉम्ब टाकणार!'