Rahul Gandhi On PM Narendra Modi :
लोकसभेचे विरोधीपक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी हे सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. गुजारतमधील जुनागढ येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका निर्णयाचं कौतुक केलं. जुनागढ येथील भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी मणिपूर येथील हिंसाचार हा अनेक दिवसांपासून सुरू असल्यांच सांगितलं. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मणिपूरला जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.
पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, 'मणिपूरचा विषय हा अनेक दिवसांपासून धुमसत आहे. आता पंतप्रधान तिकडे जात आहेत ही चांगली गोष्ट आहे.' जरी नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचं राहुल गांधी यांनी स्वागत केलं असलं तरी ते मत चोरीवरून चिमटा काढणं विसरले नाहीत.
पत्रकारांना राहुल गांधी म्हणाले, 'देशासमोरचा मुख्य प्रश्न हा मत चोरीचा आहे. हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत चोरी झाली. देशातील सर्व लोकं मत चोर म्हणत आहेत.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १३ सप्टेंबर रोजी मणिपूरला भेट देणार आहेत. ते मिझोरमला देखील भेट देतील. तिथं ते बैराबी सिरांग रेल्वे लाईन प्रोजेक्टचं उद्घाटन करतील.
यापूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मणिपूर दौऱ्यावरून टीका केली होती. त्यांनी मोदी आता मणिपूरच्या जनतेचा अपमान करत आहेत असं वक्तव्य केलं होतं.
जयराम रमेश आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहितात, '१३ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या होणाऱ्या मणिपूर भेटीचा खूप गाजावाजा केला जात आहे. मात्र वस्तूस्थिती ही आहे की ते फक्त तितं ३ तासच असणार आहेत. ते राज्यातील लोकांना इतका घाईगडबडीत केलेल्या दौऱ्यातून काय आशा दाखवणार आहेत?'
ते पुढे म्हणाले, 'खरं तर हा मणिपूरच्या जनतेचा अपमान आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची गेल्या २९ महिन्यांपासून वाट पाहत आहेत. यावरून पंतप्रधानांची मणिपूरच्या लोकांप्रती असलेली असंवेदनशिलता दिसून येते.