पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या वायनाड आणि रायबरेली यापैकी कोणत्या जागेचा राजीनामा देणार, याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागून राहीलेले होते. याबाबत त्यांनी निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
राहुल गांधी यांनी लाेकसभा निवडणूक केरळ मधील वायनाड तर उत्तर प्रदेश राज्यातील रायबरेली मतदारसंघातून लढवली हाेती. दाेन्ही मतदारसंघात त्यांना घवघवीत यश मिळाले. आता त्यांना एका मतदारसंघात राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यांनी वायनाड मतदारसंघातील जागेचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त 'पुढारी न्यूज'ने दिले आहे.
वायनाड मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाताे. राहुल गांधी यांनी वायनाड लाेकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर येथे पाेटनिवडणूक हाेईल. काँग्रेस पक्षाच्या वतीने येथे काेणाला संधी मिळणार याकडेही राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे.
दोन मतदारसंघातुन विजयी होणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला निवडणूक निकालाच्या १४ दिवसांच्या आत एक जागा सोडावी लागते.
हेही वाचा