Rahul Gandhi Emotional Post pudhari
राष्ट्रीय

Rahul Gandhi Emotional Post: आज पापा त्यांच्या सुंदर सोनियाकडे अभिमानाने पाहत असतील... राहुल गांधींची आईसाठी भावनिक पोस्ट

Anirudha Sankpal

Rahul Gandhi Emotional Post: लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी आज आपल्या आईसाठी एक भावनिक पोस्ट केली. आज दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती आहे. तसेच सोनिया गांधी यांचे 'Belonging: A Journey of Love' हे पुस्तक नोव्हेंबर मध्ये रिलीज होणार आहे.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी वडिलांच्या जयंतीनिमित्त ही पोस्ट केली आहे. यातून राहुल आणि प्रियांका यांचे त्यांच्या पालकांसोबतचे नाते कसे आहे हे दिसून येते. तसेच या वर्षांमध्ये सोनिया गांधी यांची किती वैयक्तिक हानी झाली हे देखील दर्शवते.

राहुल गांधीची भावनिक पोस्ट

राहुल गांधी आपल्या आईचा मम्मा असा उल्लेख करतात. ते म्हणतात की मी माझ्या पालकांना एकत्र पाहिलं त्याला ३५ वर्षे झाली आहेत. त्यानंतर राहुल गांधी यांनी राजीव गांधी यांच्या १९९१ मध्ये झालेल्या हत्येनंतर सोनिया गांधींचे आयुष्य कसं होतं याबाबत देखील भाष्य केलं.

राहुल गांधी म्हणतात की, 'मम्मा मी तुला आणि पापांना शेवटचं एकत्र पाहिलं होतं त्याला ३५ वर्षे उलटून गेली आहे. जेव्हापासून पापा आपल्याला सोडून गेलेत तेव्हापासून आयुष्यात जे जे काही समोर आलं त्याला तोंड देताना मी पाहिलं आहे. तू हे अत्यंत धाडसाने आणि सन्मानाने फेस केलंस.'

तुझं आयुष्य खूप अवघड होतं

ते पुढे म्हणतात, तू कोणत्या परिस्थितीतून जात होतीस आणि पापांनंतर तुझं आयुष्य किती अवघड होतं हे फक्त मला आणि प्रियांकाला माहिती आहे.

राहुल गांधी म्हणाले की, 'तुझी स्टोरी 'Belonging: A Journey of Love' अखेर लाखोल लोक वाचणार आहे याचा मला आनंद आणि अभिमान आहे. मला माहिती आहे की तुझासारखे जे लोक आपलं आयुष्य अत्यंत वैयक्तिक ठेवतात त्यांना त्यांची सुंदर स्टोरी जगाला सांगणे किती अवघड जाते.

पापा अभिमानाने पाहत असतील

राहुल गांधी राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून म्हणतात, 'आज त्यांच्या जन्म दिनी मला दिसतंय की पापा आज त्यांच्या सुंदर सोनियांकडे पाहून अभिमानाने स्माईल करत असतील.'

प्रियांका गांधी यांनी देखील पोस्ट करत, 'आज माझ्या वडिलांच्या जन्म दिनी ते नक्कीच माझ्या आईकडे तिने तिची स्टोरी ह्रदयापासून आणि इमानदारीने लिहिल्याबद्दल अभिमानाने पाहत असतील.' अशी प्रतिक्रिया दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT