Raghav Chadha Ex partner: आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये सामील झालेल्या राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी आपल्या जुन्या पक्षाला टोमाणा मारला आहे. त्यांनी आपचा राजीनामा दिल्यानंतरही त्यांची पार्टी त्यांची काही पाठ सोडत नाहीये असे खोचक वक्तव्य केलं. ते एखाद्या जुन्या प्रेमिकेप्रमाणे वागत आहेत. असा टोमणा देखील राघव चढ्ढा यांनी मारला आहे.
यापूर्वी दिल्लीच्या ड्राफ्ट वोटर लिस्टमध्ये राघव चढ्ढा यांचे नाव सामील करण्यावरून आपने चढ्ढा यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राघव चढ्ढा यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.
यापूर्वी आपचे माध्य प्रमुख अनुराग ढांडा यांनी मंगळवारी ३१ ऑगस्टला दिल्लीच्या राजेंद्र नगर बूथच्या ड्राफ्ट वोटर लीस्टमध्ये ७४६ मतदार होते. अचानक राघव चढ्ढा यांचे ७४७ वे नाव कसे आणि कधी जोडले गेले? असा आरोप केला होता. भाजप निवडणूक आयोगाच्या माध्यमातून नियमांना हरताळ फासत कोणाचेही नाव कधीही जोडले किंवा हटवण्याचे काम करत आहे असा देखील दावा त्यांनी केला.
ढांडा म्हणाले की, 'एसआयआरमध्ये खुलेआम भाजपची दादागिरी सुरू आहे. ते कोणाचेही नाव जोडत आहेत आणि कोणाचेही नाव रद्द करत आहेत. कोणतीही प्रक्रिया राबवली जात नाही. कोणत्याही स्टेप्स फॉलो केल्या जात नाहीत. याचा आज खुसाला झाला आहे.
ते म्हणाले की, ३ सप्टेंबररा राघव चढ्ढा यांनी सकाळी सकाळी पोस्ट केलं की पंजाब सरकारने त्यांने मतदार यादीतील नाव कापले. पंजाब सरकारचे याच्याशी काही घेणे देणे नाही. एसआयआर निवडणूक आयोग करत आहे. त्यांनीच त्यांचे नाव पंजाब मतदार यादीत जोडण्यास सांगितलं होतं. त्यानंतर दिल्लीचा ड्राफ्ट ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यांचे नाव नव्हते. मात्र अचानक त्यांचे नाव दिल्लीच्या ड्राफ्ट रोलमध्ये कसे आले?
राघव चढ्ढा यांनी आम आदमी पक्षाचे सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, 'असं वाटतं की मी, अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या डोक्यात घुसून बसलो आहे. जेव्हापासून मी भ्रष्टाचारी आम आदमी पार्टी सोडली आहे तेव्हापासून त्यांना ते सहनच होत नाहीये. ते एखाद्या एक्स सारखे वागत आहेत. ज्या एक्सला कोणीतरी सोडून दिलं आहे.' चढ्ढांनी एसआयआरच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शत तत्वांचे पालन केल्याचे स्पष्ट केलं.