Stone Pelting On Car pudhari
राष्ट्रीय

Stone Pelting On Car: देशात चाललंय तरी काय... मुलीला गाडीतून शाळेत सोडायला चाललेल्या आईवर सरपंचाच्या मुलांनी केली दगडफेक

व्हिडिओत काही तरूण दगड आणि विटा घेऊन एक गाडी फोडताना दिसत आहेत. या गाडीत आई आणि १२ वर्षाची मुलगी प्रवास करत होती.

Anirudha Sankpal

Stone Pelting On Car: उत्तर प्रदेशातील रायबेरलीमध्ये गाडीतून चाललेल्या आई आणि मुलीवर दगडांनी हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही तरूण दगड आणि विटा घेऊन एक गाडी फोडताना दिसत आहेत. या गाडीत आई आणि १२ वर्षाची मुलगी प्रवास करत होती. मुलगी आईकडे मला वाचव अशी रडत विनंती करताना दिसत आहे.

उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये एका गाडीतून आई आणि मुलगी जात होती. त्यावेळी त्यांच्यावर विटा आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गाडीच्या काचा फुटल्या असून मुलगी जोरजोरात ओरडताना दिसत आहे. मम्मा प्लीज मला वाचव अशी विनवणी करतानात ती दिसत आहे. पोलिसांनी हल्लेखोर आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

नेमकं काय घडलं?

ऊंचाहरच्या जगतपूरमधील उडवा गावात राहणारी रिद्धिमा सिंह आपल्या १२ वर्षाच्या मुलीला गाडीतून शाळेत सोडण्यासाठी जात होत्या. त्यावेळी गावातीलच आरोपी रितेश मिश्रा, आयुष मिश्रा (सत्यम) आणि शिवम कुमार मिश्रा यांनी रस्त्यात गाडी अडवून त्यावर तुफान दगडफेक केली.

या हल्ल्यात गाडीच्या काचा फुटल्या असून आई आणि मुलगी दोघीही जखमी झाल्या आहेत. मुलगी तर या हल्ल्यानंतर भेदरली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर फक्त उत्तर प्रदेशातच नाही तर देशभरात खळबळ माजली आहे. जर अशा प्रकारे सामान्य लोकांवर खासकरून महिलांवर भर रस्त्यात हल्ले होऊ लागले तर त्यांच्या सुरक्षेचं काय... फक्त दोन हातांनी या महिला आपलं कसं स्व संरक्षण करणार असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलीस अॅक्शन मोडमध्ये

पोलीस अधिकारी गिरीजा शंकर त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पीडितेच्या तक्रारीनंतर गावातील सरपंचाच्या मुलांसह गावातील ४ ते ५ बड्या असामींविरूद्ध जीवघेणा हल्ला करणे आणि धमकी देण्याच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच जगतपूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसऱ्या गटाकडून मारहाण केल्याच्या आरोपांची देखील चौकशी केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात इतर सहभागी आरोपींना देखील त्वरित अटक करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT