Bank Locker Durga Idol pudhari
राष्ट्रीय

Bank Locker Durga Idol: वर्षातील ३६० दिवस लॉकरमध्ये राहते ही दुर्गामाता... ४०० वर्षापासूनची अनोखी परंपरा

जयपूर राजबारीच्या या दुर्गा पूजेत मातेची सोन्याची मूर्ती आणि चांदीचे चालचित्र आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात.

Anirudha Sankpal

Bank Locker Durga Idol Navratri 2026: पश्चिम बंगालच्या पुरूलिया जिल्ह्यातील जयपूर राजबारी येथील दुर्गा पूजेची अनोखी परंपरा आहे. या दुर्गा पूजेची खासीयत म्हणजे त्याचा इतिहास आणि सोन्याची मूर्ती आहे. या दुर्गा मातेची मूर्ती ही जवळपास ३६० दिवस बँक लॉकरमध्ये सुरक्षित ठेवली जाते.

पोलीस संरक्षणात मूर्ती बाहेर काढली जाते

दुर्गा पूजेच्या निमित्ताने पाचव्या दिवशी कडक सुरक्षेत पोलीस संरक्षणात दुर्गा मातेची प्रतिमा बँक लाँकरमधून बाहेर काढत जयपूर राजबारी येथे आणली जाते. त्यावेळी सुरक्षेची खास सोय असते. पूजा संपन्न झाल्यानंतर दशमीला पुन्हा पोलीस संरक्षणात ही सोन्याची मूर्ती बँक लॉकरमध्ये सुरक्षितपणे ठेवली जाते.

जयपूर राजबारीच्या या दुर्गा पूजेत सोन्याची मूर्ती आणि चांदीचे चालचित्र आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. ही मूर्ती द्विभूजा स्वरूपातील आहे. ही अनोखी मूर्ती पाहण्यासाठी पुरूलियाशिवाय दुसऱ्या जिल्ह्यातून लोक येत असतात. काही परराज्यातील लोक देखील या देवीचे दर्शन गेण्यासाठी येतात.

जवळपास ४०० वर्षाची परंपरा

राजपरिवाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर राजबारी दुर्गा पूजाची परंपरा ही जवळपास ४०० वर्षे जुनी आहे. मान्यता अशी आहे की राजा जयसिंहच्या काळात या भागात राजपरिवाराने या धार्मिक परंपरेची सुरूवात केली. त्यानंतर राजा काशीनाथ सिंह यांच्या काळात पूजेवेळी मंदिराला आग लागण्याची घटना घडली होती. त्यानंतर राजाने दुर्गा मातेची सोन्याची मूर्ती स्थापित करण्याचा संकल्पन केला. राजपरिवाराच्या मान्यतेनुसार राजा काशीनाथ सिंह यांच्या स्वप्नात माता दुर्गेने सोन्याची मूर्ती स्थापित करण्याचा संकेत दिला होता.

यानंतर बनारसवरून कारागिरांना बोलवून ही सोन्याची मूर्ती तयार करण्यात आली. तसेच चांदेच चालचित्र देखील तयार केलं गेलं. राजपरिवाराने दिलेल्या माहितीनुसार मूर्ती आणि चालचित्र तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीचा वापर करण्यात आला आहे.

चोरीनंतर वाढवली सुरक्षा

जयपूर राजबारीमध्ये चोरीची घटना झाली होती. त्यानंतर दुर्गा मातेच्या मूर्तीबाबतच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर मूर्तीची सुरक्षा व्यवस्था बदलण्यात आली. पोलिसांच्या सल्ल्यानंतर दुर्गा मातेची सोन्याची मूर्ती पुजनाच्या दिवस सोडून पूर्ण वर्षभर बँक लॉकरमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. पूजेच्यावेळी पोलीस सुरक्षेत मूर्ती राजबारी येथे आणली जाते आणि पूजा झाल्यावर मूर्ती पुन्हा बँक लाँकरमध्ये ठेवली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT