India LPG Shortage PUDHARI
राष्ट्रीय

India LPG Shortage: भारतात LPG तुटवड्याचा पहिला बळी.... पंजाबमधील सेहना गावात घडली दुर्दैवी घटना

Anirudha Sankpal

India LPG Shortage: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता भारतात बसू लागली आहे. पेट्रोल डिझेलपाठोपाठ एलपीजी गॅसचा देखील तुटवडा जाणवत आहे. त्यातच लोकांनी गॅस एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. जरी सरकारनं देशात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा आहे असं जाहीर केलं असलं तरी ऑनलाईन बुकिंगच्या गोंधळामुळं लोकं गॅस एजन्सीबाहेर गर्दी करत आहेत.

भूषण कुमार यांचे निधन

त्यातच आज या एलपीजी शॉर्टेजचा पहिला बळी गेला आहे. पंजाबमधील बर्नाला जिल्ह्यातील सेहना गावात एलपीजी गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका व्यक्तीचा ह्रदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.

मृत झालेल्या व्यक्तीचे नाव भूषण कुमार असं असून या हा व्यक्ती एलपीजी सिलिंडर मिळवण्यासाठी पहाटे ५ वाजल्यापासून रांगेत उभा असल्याची माहिती मिळत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार कुमार हे जवळपास सकाळी ७.५० वाजता रांगेत उभे असताना खाली कोसळले.

पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

दरम्यान, केंद्र सरकारच्या पेट्रोलिय मंत्रालयाकडून आज ४ वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही लोकांमध्ये गॅस तुटवडा निर्माण झाल्याची भावना निर्माण झाल्यामुळं या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि गोंधळ टाळण्यासाठी देशातील अनेक राज्यात कंट्रोल स्थापन केल्या आहेत.

त्याचबरोबर महाराष्ट्र आणि अजून काही राज्ये या बाबत प्रत्येक दिवशी पत्रकार परिषद घेऊन याबाबत लोकांना माहिती देतील. उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये एक सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक चोरी झाला होता. पोलिसांनी कारवाई करत आरोपींना पकडलं आहे.

याचबरोबर पेट्रोलियम मंत्रालयानं सर्व वितरकांना कोणतेही बेकायदेशी कृती करायची नाहीये असा इशारा दिला. तसेत सरप्राईत इन्स्पेक्शन देखील होणार असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यांनी देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा नसल्याचं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT