राष्ट्रीय

पीएफआय, सहयोगी संस्थांवरील बंदी योग्य; युएपीए लवाद

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : गैरकृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (युएपीए) बंदी घालण्यात आलेल्या कुख्यात पीएफआय संघटनेवरील बंदी योग्य असल्याचा निर्वाळा युएपीए लवादाकडून मंगळवारी देण्यात आला. केंद्र सरकारकडून एका विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केले असल्याचा पीएफआयचा दावा देखील लवादाने फेटाळून लावला.

पीएफआय आणि तिच्या सहयोगी संस्था सामाजिक वीण बिघडविण्याचे काम करीत असल्याचे निरीक्षण लवादाने नोंदविले असल्याचे या प्रकरणाशी संबंधित वकिलांकडून सांगण्यात आले. पीएफआयच्या कारवायांशी संबंधित काही व्हिडिओ सरकारकडून लवादासमोर सादर करण्यात आले. तर शंभर लोकांची साक्षही नोंदविण्यात आली. पीएफआय आणि तिच्या सहयोगी संस्थांविरोधातील बंदी योग्य असल्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाला कळविण्यात आला असल्याचे समजते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT