Premanand Maharaj dance video file photo
राष्ट्रीय

Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांना मिळालं असं 'सरप्राईज' की महाराज स्वतःच नाचू लागले; पाहा Video

Premanand Maharaj dance video: भक्तीचा मार्ग दाखवणारे आणि लाखो अनुयायांचे श्रद्धास्थान असलेले वृंदावनचे प्रेमानंद महाराज सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहेत.

मोहन कारंडे

Premanand Maharaj

वृंदावन: भक्तीचा मार्ग दाखवणारे आणि लाखो अनुयायांचे श्रद्धास्थान असलेले वृंदावनचे प्रेमानंद महाराज सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहेत. ३० मार्च रोजी प्रेमानंद महाराज यांचा ५७ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची धामधूम मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाहायला मिळत आहे. याच दरम्यान महाराजांचा एक अत्यंत भावूक आणि भक्तीमध्ये तल्लीन झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात महाराज चक्क नाचताना दिसत आहेत.

भक्तांच्या प्रेमाने महाराज भारावले

प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भक्त वृंदावनमध्ये गर्दी करतात. मात्र, वाढदिवस जवळ येत असल्याने ही संख्या आता लाखांच्या घरात पोहोचली आहे. आश्रम, रस्ते आणि महाराज ज्या मार्गावरून मार्गक्रमण करतात, ते सर्व परिसर फुलांनी सजवण्यात आले आहेत. दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. भक्तांचे हे अफाट प्रेम पाहून महाराज स्वतः देखील भावूक झाले आहेत.

व्हिडिओमध्ये काय आहे खास?

सध्या महाराजांचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये प्रेमानंद महाराज एका वेगळ्याच रूपात दिसत आहेत. भक्तांनी दिलेल्या एका अनपेक्षीत कार्यक्रमाने महाराज इतके आनंदित झाले की, त्यांनी हातात वीणा घेऊन भक्ती संगीताच्या तालावर ठेका धरला. भक्तीत तल्लीन होऊन नाचतानाचा त्यांना पाहून सर्वजण थक्क झाले.

वृंदावनमध्ये उत्सवाचे वातावरण

दरम्यान, महाराजांच्या वाढदिवसासाठी केवळ स्थानिकच नव्हे, तर परदेशातून आणि इतर राज्यांतूनही कलाकार आपली कला सादर करण्यासाठी वृंदावनमध्ये दाखल होत आहेत. रस्ते दररोज नवनवीन फुलांनी सजवले जात असून, ३० मार्च रोजी होणाऱ्या मुख्य सोहळ्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT