PSI Corruption Case pudhari
राष्ट्रीय

PSI Corruption Case: नोकरी ५ वर्षे, कमाई ३५ लाख.. खर्च केले ४६ लाख! PSI ला वीमा, फंडाची हाव भोवली; अलगद ACB च्या जाळ्यात अडकला

PSI Corruption Case: पीएसआयने आपल्या साडे पाच वर्षाच्या नोकरीत एवढी मोठी आर्थिक उडी घेतली की त्याच्यविरूद्ध थेट अँटी करप्शनची चौकशीच लागली आहे.

Anirudha Sankpal

PSI Corruption Case: पीएसआयने आपल्या साडे पाच वर्षाच्या नोकरीत एवढी मोठी आर्थिक उडी घेतली की त्याच्यविरूद्ध थेट अँटी करप्शनची चौकशीच लागली आहे. युपीमधील प्रयागराजमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यात एका पीएसआयने अर्थात दरोगाने वैध उत्पन्न स्त्रोताच्या माध्यमातून ३५ लाख रूपये कमवले. मात्र या पीएसआयने ४६ लाख रूपयांपेक्षा जास्त संपत्ती कमवली अन् ती खर्च देखील केली. कामाई आणि खर्चाचे एवढे मोठे अंतर अँटी करप्शनच्या डोळ्यात आलं अन् त्या पीएसआयविरूद्धचा फास आवळ्यास सुरूवात झाली.

उत्पन्नापेक्षा ३०.९२ टक्के जास्त संपत्ती

प्रयागराजच्या नवाबगंज पोलीस ठाण्यातील शृंग्वेरपूर रिपोर्टिंग पोलीस चौकीचे प्रभारी असलेल्या पीएसआय आशीष कुमार राय यांच्याविरूद्ध उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती मिळवल्याचे आरोप करण्यात आले. त्या प्रकरणात त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या उत्पन्नापेक्षा ३०.९२ टक्के जास्त संपत्ती मिळवल्याचे समोर आले आहे.

मुळात गाजीपूरच्या जमानिया पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सैदाबाद गावचे रहिवासी असलेल्या आशीष कुमार राय हे सध्या कासगंज पोलीस ठाण्यात तैनात आहेत. शृंग्वेरपूर चौकीत तैनात असताना त्यांची कार्यपद्धती आणि संपत्तीबाबत तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन डीजीपींच्या परवानगीने १४ ऑगस्ट २०२४ रोजी कुमार यांची चौकशी सुरू झाली. अँटी करप्शन प्रयागराज सर्कलचे निरीक्षक रविंद्र सिंह यांना तपासात या पीएसआयच्या आर्थिक व्यवहारांबाबत धक्कादायक माहिती मिळाली.

पीएसआयकडे उत्तरच नाही

तपास यंत्रणांनी १ जानेवारी २०१८ पासून २० जून २०२३ या कालावधीच्या आर्थिक व्यवहारांचा तपास केला. त्यावेळी पीएसआयने वेतन, बोनस आणि एरियर्स तसेच बँकेच्या व्याजाव्यतिरिक्त सर्व ज्ञात आर्थिक स्त्रोतांमधून जवळपास ३५ लाख ३९ हजार ८४९ रूपये कमवल्याचे समोर आले. एवढंच नाही तर या कालावधीत त्याने चल स्थावर अन् जंगम मालमत्ता, वीमा पॉलिसी, म्युचअल फंड, बँक सेव्हिंग आणि कुटुंबाच्या पालन पोषणासाठी एकूण ४६ लाख ३४ हजार ४१८ रूपये खर्च केले होते.

पीएसआयने आपल्या अधिकृत उत्पन्नाच्या स्त्रोतातून १० लाख ९४ हजार ५६९ रूपये अतिरिक्त खर्च केले. या खर्चाचे तपासादरम्यान समाधानकारक उत्तर हा पीएसआय देऊ शकला नाही. त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या दोषी आढळल्याने psi विरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.

वीमा, म्युचअल फंडमध्ये खपवली रक्कम

तपासात मिळालेली धक्कादायक माहिती म्हणजे पीएसआयने अतिरिक्त रक्कम ही थेट कॅश स्वरूपात ठेवण्याऐवजी ती वीमा आणि म्युचअर फंडात गुंतवली. पीएसआयने स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासोबतच एलआयसी, एसपीआय लाईफच्या पॉलिसी आणि म्युचअल फंडात देखील गुंतवणूक केली. त्याची देखील सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT