राष्ट्रीय

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिवाळी जवानांसाेबत

नंदू लटके

सीमेवरील जवानांबरोबर दिवाळी साजरी करण्‍याची परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi : ) यांनी यावर्षी कायम ठेवली. जम्‍मूतील राजौरी जिल्‍ह्याच्‍या नौशेरा सेक्‍टरला  त्‍यांनी भेट दिली.

'तुमच्‍या कुटुंबीयांचा सदस्‍य म्‍हणून मी आलोय'

या वेळी जवानांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले, तुमच्‍या कुटुंबीयांचा सदस्‍य म्‍हणून मी येथे आलाे आहे. मी १२० कोटी देशवासीयांचा आशीर्वाद तुमच्‍यासाठी घेवून आलोय. तुम्‍ही भारतमातेची करत असलेली सेवा खूपच महत्‍वपूर्ण आहे. हे सौभाग्‍य काहींच्‍या वाट्याला येते. तुम्‍ही देशाचे सुरक्षा कवच आहात. तुमच्‍यामुळे १२० कोटी नागरिक सुखाची झोप घेवू शकतात, असेही मोदी यांनी सांगितले.

देशाची संरक्षणासाठी  प्राणाहुती देणार्‍या वीरांना मी नमन करतो. देशासाठी बलिदान देणार्‍या जवानांच्‍या पराक्रमामुळेच आज देश सुरक्षित आहे. आपण स्वांतत्र्याचा अमृतमहोत्सव वर्ष साजरा करत आहोत. या काळात आपल्‍यामसोर नवे संकल्‍प आहेत,. तसेच नवी आव्‍हानेही आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले.

पंतप्रधानपदाची सूत्रे स्‍वीकारल्‍यानंतर मागील सात वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi : ) यांनी जम्‍मू-काश्‍मीर आणि लडाखमधील सीमेवरील जवानांबरोबर चारवेळा दिवाळी साजरी केली आहे. २०१४ मध्‍ये पंतप्रधान मोदी यांनी सियाचीन येथे दिवाळी साजरी केली हाेती. यानंतर त्‍यांनी श्रीनगरला भेट दिली होती.

२०१७ मध्‍ये पंतप्रधान माेदी यांनी काश्‍मीरमधील बांदीपोरामध्‍ये लष्‍कराचे जवान आणि सीमा सुरक्षा दलाचे जवानांबरोबर दिवाळी साजरी केली होती. तर २०१९मध्‍ये राजौरी येथील जवानांबरोबर दिवाळी साजरी केली होती. मागील वर्षी काेराना प्रादुर्भावामुळे पंतप्रधान माेदी यांना जवानांबराेबर दिवाळी साजरी करता आली नव्‍हती.

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजौरी येथे पोहचले आहेत. पंतप्रधान मोदींच्‍या दौर्‍याच्‍या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट सुरक्षा तैनात केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या वर्षी सर्वांच्‍या जीवनात सुख, संपन्‍नता आणि सौभाग्‍य यावे, अशा शब्‍दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिवाळीच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.