Narendra Modi Warns pudhari
राष्ट्रीय

Narendra Modi NEET Paper Leak: युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही.... नरेंद्र मोदींची पोस्ट, नेमका इशारा कोणाकडे?

Anirudha Sankpal

Narendra Modi Warns On NEET Paper Leak: नीट पेपर लीक प्रकरणी कॉक्रोज जनता पार्टीने दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे. त्याचबरोबर विरोक्षी पक्षांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा देत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत पावसाळी अधिवेशनाचे सभागृहातील कामकाज बंद पाडलं आहे.

दरम्यान, या विषयावर आपल्या भाषणात एक चकार शब्द न काढणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर सोशल मीडिया पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, 'पेपर लीक प्रकरणात लवकरात लवकर दोषींवर कारवाई करण्यासाठी आणि याचा न्याय त्वरित होण्यासाठी एका फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केलं जाईल. या बाबतचे सर्व आदेश दिले गेले आहेत. संबंधित विभागांना आवश्यक कारवाई करण्यास सांगितलं आहे.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतात की, 'विद्यार्थांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी सरकारकडून घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांमधील हा एक महत्वाचा निर्णय आहे. युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडण्यात येणार नाही.' नरेंद्र मोदी यांनी युवकांच्या भविष्याशी कोण खेळतंय आणि कोणाला सोडणार नाही याचं काही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळं त्यांचा इशारा कोणाकडे होता हे काही स्पष्ट होत नाही.

तत्पूर्वी, बुधवारी रात्री पोलिसांवर झालेल्या दगडफेकीबाबत कॉक्रेज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी प्रतिक्रिया देत यात सीजेपीच्या आंदोलकांचा कोणताही हात नसल्याचे सांगितलं. अभिजीत दिपके म्हणाले, 'बाहेरून लोकं पाठवली जात आहेत. त्यांना आंदोलनाला गालबोट लावायचे आहे. आम्ही इथं एका महिन्यापासून बसलो आहे. एका महिन्यात कोणती घटना झाली नाही. मात्र आताच का या घटना होत आहेत. आता आंदोलन मोठं झालं आहे. आता बाहेरून गुंड पाठवले जात आहे. भाजपद्वारे हे केलं जात आहे. त्यांना लोकांना जाणून बुजून उकसवायचं आहे.

दिपकेंनी या दगडफेकीबाबत पोलीस आणि भाजप यांची मिलीभगत असल्याचा दावा केला आहे. पोलीस दगड घेऊन येतात आणि भाजपचे लोक ते फेकतात. पोलीस दगडांनी भरलेले ट्रक आणून उभे करत आहे. त्यानंतर बाजपचे गुंड येऊन दगडफेक करतात आणि कॉक्रोज जनता पार्टीला बदनाम करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT