PM Kishan Installment Date: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजाना ही केंद्र सरकारची एक महत्वाची कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील करोडो छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिलं जातं. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर वर्षी ६ हजार रूपये दिले जातात. हे पैसे तीन हप्त्यात दिले जातात.
आतापर्यंत केंद्र सरकारने याचे २१ हप्ते दिले आहेत. आता शेतकरी २२ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. नवीन वर्ष सुरू झाल्यावर पीएम किसानचे पैसे कधी मिळणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि आतुरता आहे.
गेल्या वर्षांचा ट्रेंड पाहिला तर PM Kisan Yojana चा २२ वा हप्ता हा पुढच्या फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.
प्रत्येक वर्षी दर चार महिन्यांनी पीएम किसानचा हप्ता मिळतो.
गेल्या काही हप्त्यांचा विचार केला तर फेब्रुवारी महिन्यात हा हप्ता मिळू शकतो.
हप्ता कधी मिळणार याबाबत अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.
२२ वा पीएम किसान हप्ता हा त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ते या योजनेच्या सर्व निकषात बसतात.
त्याचबरोबर ज्यांची e-KYC पूर्ण झाली आहे. आधार आणि बँक खाते लिंक आहे. जमीन रेकॉर्ड व्हेरिफिकेशन झालं आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे.
जर यातील एकही प्रक्रिया अपूर्ण राहिली असेल तर तुमचा हप्ता लटकू शकतो.
यासाठी तुम्हाला Beneficiary List चेक करावी लागणार आहे. ही यादी pmkisan.gov.in वर मिळते.
या वेबसाईटवर Beneficiary List चा पर्याय निवडा आणि त्यानंतर आपलं राज्य, जिल्हा, सब डिस्ट्रिक्ट, ब्लॉक आणि गावाचं नाव टाका.
यानंतर 'गेट रिपोर्ट' हा पर्याय निवडा. त्यानंतर एक लिस्ट येईल त्यात आपलं नाव शोधा.
तसेच Know Your Status हा पर्याय निवडून तुम्ही तुमच्या हप्त्याचा स्टेटस पाहू शकता.