Palash Muchhal Premanand Maharaj:
संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलचं क्रिकेटपटू स्मृती मानधनासोबत लग्न होता होता राहिलं. स्मृतीच्या वडिलांची प्रकृती ढासळल्यामुळं या दोघांचे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं. यानंतर पलाश मुच्छलबाबत अनेक वादग्रस्त चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता हाच पलाश मुच्छल वृंदावनमधील प्रसिद्ध महराज प्रेमानंद महाराज यांच्या चरणी लीन झाल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे कठिण काळात भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली देखील याच प्रेमानंद महाराज यांचा सल्ला घेण्यासाठी वृंदावनला जातो.
पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांचे २३ नोव्हेंबर रोजी लग्न होणार होते. मात्र शेवटच्या क्षणी हे लग्न पुढं ढकलण्यात आलं. आधी स्मृतीच्या वडिलांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर पलाश देखील रूग्णालयात दाखल झाला होता. या दोघांचे लग्न मोडल्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, स्मृती आणि पलाश यांचा रिलेशनशिप स्टेटस काय याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. सोशल मीडियावर याबाबत अनेक थेअरी फ्लोट होत आहेत. काही जणांच्या मते यांचे ७ डिसेंबरला पुन्हा लग्न होणार आहे. मात्र याबाबतचे वृत्त स्मृती मानधनाच्या भावाने फेटाळून लावलं आहे. त्यानं या बाबतच्या शक्यतेची मला काहीही माहिती नाही असं उथ्तर दिलं होतं. सध्या तरी हे लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे असा देखील त्यानं खुलासा केला होता.
दरम्यान, प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात पलाश आणि त्याची आई बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबतचं वृत्त झूमने दिलं आहे. एवढंच नाही तर या व्हिडिओत अभिनेता राजपाल यादव देखील दिसत आहे. त्यामुळं राजपाल यादव आणि पलाश मुच्छल या दोघांनी एकत्रित प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घेतल्याची देखील चर्चा आहे. हे दोघे चांगले मित्र आहेत.