पुढारी डिजिटल टीम
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलचं लग्न सध्या चर्चेत आहे. दोघांच्या नेटवर्थ किती आहे ते पाहूयात.
लग्नाच्या आधी स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने सोहळा पुढे ढकलला गेला. त्यानंतर पलाशही रुग्णालयात दाखल झाल्याने चर्चा आणखी वाढली.
स्मृती मंधाना भारतीय महिला क्रिकेटची सर्वात मोठी स्टार मानली जाते. टीम इंडियाची व्हाइस-कॅप्टन म्हणून तिचा परफॉर्मन्स सर्वांना ठाऊक आहे.
BCCI च्या A-ग्रेड करारामुळे स्मृतीला वर्षाला मोठं उत्पन्न मिळतं. टेस्ट, ODI आणि T20 प्रत्येक फॉरमॅटमध्ये तिची कमाई तगडी आहे.
WPL मध्ये RCB कडून तिला 3.4 कोटी रुपये मिळतात. अंदाजानुसार स्मृतीची नेटवर्थ 32 ते 34 कोटी रुपयांदरम्यान आहे.
पलाश मुच्छल पलक मुच्छलचा भाऊ असून तो संगीत क्षेत्रात आहे. कंपोजिशन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा अनेक क्षेत्रांत तो काम करतो.
पलाशची कमाई प्रामुख्याने प्रोजेक्टनुसार बदलते. त्याचे संगीत, रॉयल्टी आणि म्युझिक व्हिडिओ त्याला चांगलं उत्पन्न मिळून देतात.
त्याची एकूण नेटवर्थ 20 ते 42 कोटी दरम्यान असल्याचा अंदाज आहे. कामाच्या प्रकारानुसार त्याच्या उत्पन्नात चढ-उतार होतात.
स्मृती आणि पलाश दोघेही आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत. नेटवर्थच्या तुलनेत स्मृती मंधाना आजही पुढे असल्याचं दिसून येतं.