

Smriti Palash Marriage Date:
स्मृती मानधना अन् पलाश मुच्छल यांचे २३ नोव्हेंबर रोजी होणारे लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यावर आता पलाश मुच्छलनं एक गूड न्यूज दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यानं स्मृती मानधनासोबत लवकरच तो लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं सांगितलं. या दोघांच्या लग्नात आलेली विघ्न दूर झाली आहेत.
स्मृती मानधानाचे वडील श्रीनिवास मानधना यांची लग्नाच्या आदल्या दिवशी तब्येत बिघडली होती. त्यानंतर स्मृती अन् पलाशचं लग्न अनिश्चित काळासाठी पुढ ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. आता या घोषणेनंतर ८ दिवसांनी असं वृत्त येत आहे की पलाश आणि स्मृती रविवारी लग्न करणार आहेत. याबाबतची सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल होत होती.
पलाश आणि स्मृती हे त्वरित लग्न करणार असून या लग्नात फक्त जवळचे काही लोकंच उपस्थित असतील. हे लग्न सांगलीत होणार आहे. या लग्नाबाबतचे प्री वेडिंग फंक्शन सुरू झालं आहे. दोन्ही कुटुंबीय आणि स्मृती पलाश यांच्या लग्नाचा सोहळा सुरू झालाय अशी पोस्ट व्हायरल होत होती. मात्र हे वृत्त खर नसून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली पोस्ट आता डिलीट झाली आहे. डिलीट झालेल्या पोस्टमध्ये पलाश मुच्छलनेच लग्नाची नवी तारीख जाहीर केल्याचा उल्लेख होता.
स्मृती मानधना आणि पलाश यांच्या २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लग्नाचा सोहळा सांगलीत मोठ्या थाटामाटत सुरू होता. मात्र लग्नाला काही तास शिल्लक असतानाच स्मृती यांच्या वडिलांची तब्येत बिघडली अन् त्यानंतर हे लग्न पुढे ढकलण्यात आली. यानंतर स्मृतीने आपल्या इन्स्टाग्रामवरील लग्नासंदर्भातील सर्व पोस्ट डिलीट केल्या.
लग्न पुढे ढकलण्यात आल्यानंतर पलाशने स्मृतीला चीट केल्याच्या काही स्क्रीनशॉट्स देखील व्हायरल झाले होते. मात्र याबाबत ना स्मृती ना पलाशनं कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. या दोघांनी फक्त आपल्या इन्स्टा बायोमध्ये बदल करत इव्हिल आय चा इमोजी अॅड केला होता. हा इमोजी नजर लागू नये म्हणून वापरला जातो अशी मान्यता आहे.
दरम्यान, पलाश यांची आई अमिता मुच्छल यांनी पलाशचं लग्न लवकरच होणार आहे अशी प्रतिक्रिया हिंदूस्तान टाईम्सला दिली होती.