Pakistan Drone Use for drugs: राजस्थानमध्ये सीमेच्या पलीकडून ड्रोनद्वारे ड्रग्जची वाढती तस्करी हा मुद्दा राज्यसभेत देखील गाजला. खासदार घनश्याम तिवारी यांनी झिरो अवर दरम्यान हा मुद्दा उपस्थित करत राजस्थानला विशेष पोलीस दलासाठी विभागीय सहाय्यता मिळावी अशी मागणी केली.
खासदार तिवारी यांनी राजस्थानमध्ये एक हजार किलोमीटर पेक्षा लांब आंतरराष्ट्रीय सीमा आहे. या सीमेवर ड्रोनच्या माध्यमातून अंमली पदार्थ ड्रॉप केले जातात. असा प्रकारचे अंमली पदार्थ अनेकवेळा पकडण्यात देखील आले आहेत. मात्र आता हे एक रूटीन झालं आहे. या माध्यमातून पाकिस्तानातून भारताता ड्रग्ज आणले जातात. त्यामुळेच या प्रवृत्तीला आणि ड्रग्ज तस्करीला आळा घालण्याची गरज आहे.
बीएसएफ, सेना आणि राजस्थान पोलीस या ड्रग्स तस्करीच्या समस्येवर काम करत आहेत. मात्र राजस्थानच्या सीमाभागात अजून पोलीस चौक्या उभारण्याची गरज आहे. त्यासाठी संसाधनांची आवश्यकता आहे. रात्री गस्त घालण्यासाठी पोलिसांनी विशेष उपरकणांची गरज आहे.
तिवारी यांनी अनेक सीमाभागातील गावांच्या डेमोग्राफीमध्ये देखील बदल झाला आहे. या गावांमध्ये असे अनेक लोकं रहात आहेत जे या बाजूलाही राहतात अन् पलिकडे पाकिस्तानात देखील राहतात. ही लोकं तस्करीला हातभार लावत आहेत. त्यांच्या नेक्ससला तोडलं पाहिजे.
यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राजस्थानला अतिरिक्त सहाय्य मिळावी. विशेष पोलीस दलाची स्थापना करण्यात यावी. जेणेकरून आंतरराष्ट्रीय सीमेवरून ड्रग्ज तस्करी रोखता येईल अन् युवकांना नशेच्या आहारी जाण्यापासून रोखता येईल.